ताज्याघडामोडी

लक्ष्मी टाकळी टोलनाका येथे अशोक ब्रिजवेजच्या वतीने वाहनचालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील अशोका ब्रिजवेजच्या टोलनाक्यावर राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानाचे उदघाटन पंढरपूर बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री गावडे व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या हस्ते करण्यात आले.या अभियानांतगर्त वाहनचालकांची नेत्र तपासणी यावेळी अशोक ब्रिजवेज च्या माध्यमातून करण्यात आली असून यात शेकडो वाहनचालकांची नेत्रचिकित्सक डॉ.आर.एन. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहाय्यक अभियंता अक्षय यादव,सहायक अभियंता सौ.ए.एच.वाडकर,वाहतूक पोलीस शाखेचा विविध अधिकारी […]

ताज्याघडामोडी

बोगस लग्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

जालना : वराकडील मंडळींकडून पैसे उकळून खोटे लग्न करणाऱ्या वधूंच्या एका टोळीला जालन्यातील चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ३ वधुंसह एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. गुजरात मधील तरुणांशी लग्न केल्यानंतर सासरी जाताना तिन्हीही वधूंनी रस्त्यावर गाडी थांबवून बाथरूमला जाण्याचं निमित्त करून पोबारा केल्यानं हा प्रकार उघड झालाय.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या […]

ताज्याघडामोडी

अनवली ग्रामपंचायतीवर सिध्दनाथ जोगेश्वरी स्वाभिमानी महाविकास आघाडीचे वर्चस्व 11 पैकी 9 जागांवर मिळविला दणदणीत विजय

अनवली ग्रामपंचायतीवर सिध्दनाथ जोगेश्वरी स्वाभिमानी महाविकास आघाडीचे वर्चस्व 11 पैकी 9 जागांवर मिळविला दणदणीत विजय पंढरपूर – पंढरपूर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत अनवली ग्रामपंचायतीवर परिवर्तन झाले असून यामध्ये सिध्दनाथ जोगेश्वरी स्वाभिमानी महाविकास आघाडीने 11 पैकी 9 जागांवर दणदणीत विजय मिळवून ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सदरची निवडणूक सिध्दनाथ भोसले (चेअरमन), पिंटू भोसले (युवक कॉंग्रेस […]

ताज्याघडामोडी

पिठाची गिरणी, छोटे किराणा दुकान, मिनी दाल मिल आदींसाठी मिळणार महिलांना अनुदान

जिल्हा परिषदेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींचा बारावीनंतर सत्कार यापूर्वी करण्यात येत होता. आता दहावी व बारावीच्या १८ वर्षाच्या आतील मुलांचा व मुलींचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना विविध साहित्य पुरविणे या योजनेंतर्गत पिठाची गिरणी, सौर कंदील, शिलाई मशीन, पिको फॉल मशीन तसेच प्रचलित परिस्थितीनुसार पल्वराईझर (ओले/ सुके उळण यंत्र), पशुधन […]

ताज्याघडामोडी निविदा सूचना

तर तुमचा वीजपुरवठा खंडित होणार

मुंबई, 19 जानेवारी : लॉकडाऊन काळात वीज सवलत देण्याची भाषा करणाऱ्या उर्जा मंत्रालयाने आता ग्राहकांना इशारा देत वीजबिल वसुलीची मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. थकबाकी वसूल करण्याचे आणि थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास आज दिले आहेत. ‘डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे […]

ताज्याघडामोडी

रेल्वे उड्डाण पुलावरून उडी मारून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

बीड, 19 जानेवारी : बीड जिल्ह्यातील परळी इथं रेल्वे उड्डाणपुलावरून उडी मारुन एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुनील घोळवे असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परळीत एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्याचे  कर्मचारी सुनील सुंदरराव घोळवे बक्कल क्रमांक 755 यांनी सोमवारी संध्याकाळी […]

ताज्याघडामोडी

अयोध्या रामजन्मभूमी मंदिरासाठी अभिजीत पाटील यांनी १लक्ष रू. दिली देणगी

प्रभू श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानात पंढरपूर येथील अभिजीत पाटील यांनी सहभाग नोंदवून एक लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. सध्या श्रीराम जन्मभूमि मंदिराचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरु असून तीन वर्षाच्या कार्यकाळात हे मंदिर बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे. अतिभव्य असा या मंदिराच्या बांधकामासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. यासाठी श्रीराम जन्मभूमी […]

ताज्याघडामोडी

.२१ जानेवारी पासून अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष पदवी आणि एम.टेकच्या दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरवात

.२१ जानेवारी पासून अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष पदवी आणि एम.टेकच्या दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरवात पंढरपूरः ‘प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) आणि पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.टेक च्या प्रवेशासाठी गुरुवार, दि.२१ जानेवारी २०२१ पासून  दुसऱ्या प्रवेश फेरीचे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु होत असून यासाठी तीन दिवसांचा कालावधी असणार आहे. या कालावधीत विशेषतः पहिल्या कॅप […]

ताज्याघडामोडी

क्रिकेटच्या मॅचवरून दोन गटात तुफान राडा

पनवेल, 19 जानेवारी : नवी मुंबईमध्ये क्रिकेटच्या मॅचवेळी दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. रविवारी कंळबोलीमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये स्थानिक नगरसेवकाच्या टीमचा विजय झाला, पण यानंतर दोन टीममध्ये बाचाबाची झाली. यानंतर रात्री 10 च्या सुमारास विजय झालेल्या टीमच्या खेळाडूंच्या मेडिकल स्टोअरमध्ये पराभूत झालेले खेळाडू […]

ताज्याघडामोडी

आता गृहनिर्माण सोसायट्यांना सीसीटीव्ही बंधनकारक

मुंबई : महत्वाची बातमी. आता यापुढे सोसायट्यांना सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी कायद्याच्या कलम 144 मधील तरतुदीनुसार शहरातील सर्व खासगी संस्था, आस्थापना यांना सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.या खासगी संस्था, आस्थापनांच्या बाहेरील सर्व परिसर हा सीसीटीव्हीच्या नजरेत आला पाहिजे, त्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. दिवसागणिक अनेक घटनांत वाढ होत आहे. गुन्हेगारीला […]