ताज्याघडामोडी

लक्ष्मी टाकळी टोलनाका येथे अशोक ब्रिजवेजच्या वतीने वाहनचालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील अशोका ब्रिजवेजच्या टोलनाक्यावर राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानाचे उदघाटन पंढरपूर बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री गावडे व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या हस्ते करण्यात आले.या अभियानांतगर्त वाहनचालकांची नेत्र तपासणी यावेळी अशोक ब्रिजवेज च्या माध्यमातून करण्यात आली असून यात शेकडो वाहनचालकांची नेत्रचिकित्सक डॉ.आर.एन. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यावेळी सहाय्यक अभियंता अक्षय यादव,सहायक अभियंता सौ.ए.एच.वाडकर,वाहतूक पोलीस शाखेचा विविध अधिकारी व व्यवस्थापक उत्तम पवार,बांधकाम अभियंता प्रवीण शिंदे,धनंजय पाटील,अरुण काळे यांच्यासह अशोका ब्रिजवेजचा सर्व स्टाफ व वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी व्यवस्थापक उत्तम पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *