काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारबाबत मोठं भाष्य केलं आहे.राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल लवकरच लागणार आहे. या निकालानंतर सरकार पडण्याची चाहुल लागल्याच्या भितीनेच मंत्रालयात लगबग सुरु झाली, असल्याचा मोठा दावा नाना पटोले यांनी केला आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल, यावर भाष्य करणे योग्य नाही. परंतु मंत्रालयात लगबग सुरु झाली असल्याची माहिती मिळत […]
ताज्याघडामोडी
महिलांना आजपासून एसटीच्या भाड्यात 50 टक्के सूट, नवे नियम लागू !
राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून त्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमध्ये पन्नास टक्के भाड्यात प्रवास करता येणार आहे. आजपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात केली होती. ही योजना आजपासून लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून एक परिपत्रक काढून या योजनेची माहिती देण्यात […]
बावीस हजाराची लाच घेताना महावितरणच्या असिस्टंट इंजिनिअरला अटक
सोलार इंस्टॉलेशनच्या प्रकल्पासाठी तांत्रिक योग्यता (टेक्निकल फिजीबिलीटी) देण्यासाठी बावीस हजाराची लाच घेताना लातूरातील महावितरणच्या सहायक अभियंत्याला ॲन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. असून गोविंद तुकाराम सर्जे (वय 46 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. त्यांनी सोलार इंस्टॉलेशनच्या कामासाठी 22 हजारांची लाच मागीतली होती. लातूरातील एकाचा सोलार इंस्टॉलेशनचा व्यावसाय असून त्यांनी हाती घेतलेल्या ग्राहकाच्या […]
समन्स बजावायला जाताना काळाची झडप, ३२ वर्षीय पोलिसाचा ऑन ड्युटी मृत्यू, गरोदर पत्नीला धक्का
भुसावळ शहर पोलीस ठाण्यातील तरुण पोलीस कर्मचार्याचा कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. सागर दिलीप देहाडे (वय ३२ वर्ष, वाघ नगर, जळगाव) असे मयत पोलीस कर्मचार्याचे नाव आहे. तरुण कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या घटनेने पोलीस दल सुन्न झाले असून आज दिवसभर जिल्हा पोलिस दलात याच घटनेची चर्चा होती. जळगाव शहरातील वाघ नगर […]
धाडस आणि विश्वास याच्या जोरावरच एल के पी मल्टीस्टेट यशाचे शिखर गाठेल– प्रा. नितीन बानुगडे पाटील
एल के पी मल्टीस्टेट भोसे शाखेचा लोकार्पण सोहळा संपन्न साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण होत असताना महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन प्रांतांचा निकटचा संबंध आला होता . रयत आणि मावळे यांचा अपार विश्वास तसेच प्रचंड धाडस याच्या जोरावरच छत्रपतींनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य उभा केले. महाराजांचा इतिहास फक्त वाचून आणि ऐकून चालणार नाही तर […]
चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुकलीला घेऊन जायचा, मग गावात राहणारा आजोबाच…
चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेऊन 9 वर्षाच्या चिमुकलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या 70 वर्षाच्या वृद्धाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्याच्या मुळशी तालुक्यात ही धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संतोष वाघू कंधारे असं बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडित […]
लेक गोबरगॅसच्या टाकीत पडला; शेणातून बाहेर काढण्यासाठी बाबा-काका धावले; चौघांचा करुण अंत
बारामती तालुक्यात आज एक धक्कादायक घटना घडली. ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या निचरा चारीत पडून चौघांचा मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील खांडज गावात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत पिता-पुत्रासह चुलत्याचा व अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. घरातले कर्ते पुरुष गेल्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आता आम्ही जगायचं कसं असा प्रश्न त्यांना पडला आहे. तिघांच्या अचानक […]
ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन गट पडले आहे. अगदी बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाला गळती लागली आहे. ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. अलीकडेच उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भूषण देसाईंचं शिंदे गटात प्रवेश करणं ठाकरे […]
सरन्यायाधीशांनी कोश्यारींना झोडलं, प्रश्नांची सरबत्ती, उद्धव ठाकरेंना आनंद, म्हणाले,आता….
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष प्रकरणात आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर कडक शब्दात ताशेरे ओढले. पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलावणं म्हणजे सरकार पाडण्यात वाटा उचलणं किंबहुना पक्ष फोडण्यात मदत करणं. राज्यपालांनी अशा कृतीपासून दूर राहावं किंबहुना राज्यपालांनी आपल्या मर्यादेत राहावं, अशा शब्दात सरन्यायाधीशांनी तत्कालिन राज्यपालांना […]
बायको अन् मुलाला संपवलं, नंतर स्वत: उचललं टोकाचं पाऊल
पुण्यातल्या औंध परिसरात एका आयटीआय इंजिनीयरने आपल्या मुलासह पत्नीची हत्या करून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पॉलिथिनची पिशवी तोंडाला गुंडाळून मुलगा आणि पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. औंध येथील डीपी रोड परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. प्रियांका गांगुली (वय ४०), मुलगा तनिष्क गांगुली (वय ०८) आणि पती […]