ताज्याघडामोडी

पत्नीचं पार्थिव खांद्यावर घेऊन ३३ किमी चालला, माणुसकीवर प्रश्नचिन्ह

ओदिशा येथील एका व्यक्तीवर जी वेळ आली ती जगात कोणावरही येऊ नये. कोरापूट जिल्ह्यातील एका ३५ वर्षीय व्यक्तीच्या पत्नीचा शेजारील आंध्र प्रदेशातील रुग्णालयातून परतत असताना ऑटो-रिक्षात मृत्यू झाला. त्यानंतर त्या ऑटो रिक्षा चालकाने त्याला रिक्षातून उतरायला सांगितलं. नाईलाजाने या व्यक्तीला पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन घेऊन अनेक किलोमीटर चालत जावं लागलं. नशिबाने रस्त्यात त्यांच्या मदतीला पोलीस धावून […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर-सांगोला रेल्वे मार्गावरील गेट क्रमांक 24 दिनांक दि.13 फेब्रुवारी रात्री ११ वाजे पर्यंत बंद राहणार

रस्ते वाहतुकीसाठी पर्यायी रस्ते मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन पंढरपूर सांगोला रेल्वे मार्गावरील टाकळी रस्त्यावरील गेट क्रमांक 24 हे रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी सात वाजलेपासून ते सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी या रेल्वे गेटवरील रस्त्याने ये-जा […]

ताज्याघडामोडी

…तर तुमचा पराभव होईल,पोटनिवडणुकीपूर्वी वसंत मोरेंचा शिंदे फडणवीसांना इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका घेण्यात याव्यात अशी भूमिका घेतली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकर घेण्यात यावी, अशी भूमिका मांडली. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा दाखला देत पुणे महापालिकेची निवडणूक घेण्याची मागणी केली. वसंत मोरे यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट […]

ताज्याघडामोडी

फ्रेंड रिक्वेस्ट पडली महागात, आधी चॅटिंग, नंतर तरुणीला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

समाज माध्यमं जितकी फायद्याची, तितकीच धोकादायक असल्याची प्रचिती आणणाऱ्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहे. त्यातल्या त्यात मुलींसाठी सोशल मीडिया किती घातक ठरु शकतं, याचीही अनेक उदाहरणं आहेत. असंच एक उदाहरण आता नाशिकमधून समोर येत आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्या अंतर्गत समाज माध्यमांचा वापर करून एका मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. नाशिकमधून समोर आलेली […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यातील आरोग्य केंद्रासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध

जिल्हा नियोजन समितीकडे आ.आवताडेंचा पाठपुरावा  पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व उपकेंद्रांच्या भौतिक सोई – सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्यामार्फत ९३लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार आवताडे यांनी आज दिली आहे. सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सभागृह अंतर्गत विशेष सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली आहे. […]

ताज्याघडामोडी

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षेसाठी बोर्डाने जारी केले नवे नियम

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अनेक नियम यंदा बदलण्यात आले आहेत. यासोबतच फसवणूक मुक्त परीक्षा आयोजित करण्यासाठी काही कठोर नियमही जाहीर करण्यात आले आहेत. उमेदवाराने परीक्षेचा पेपर चोरल्यास, मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर घेतला, विकत घेतला किंवा पाठवला तर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्याचे निलंबन करण्यात येणार […]

ताज्याघडामोडी

फेशियलचा बहाणा, नवरदेव पळाला; लहान भावानं वहिनीसोबत लग्न करताच मोठा भाऊ परतला अन् मग…

उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये एक नवरदेव फेशियल करायच्या बहाण्यानं फरार झाला. त्यामुळे कुटुंबाला नाचक्की सहन करावी लागली. अखेर नवरदेवाचा लहान भाऊ नवरीसोबत लग्न करेल, असा तोडगा काढण्यात आला. हा तोडगा मुलीकडच्यांनी मान्य केला. त्यामुळे अखेर विवाह सोहळा संपन्न झाला. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. लहान भावानं लग्न केल्यानंतर त्याचा मोठा भाऊ घरी परतला […]

ताज्याघडामोडी

मित्रांसाठी कर्ज घेतलं, पण त्यांनीच धोका दिला, सावकारानेही छळलं, नको ते करुन बसला…

अवैध सावकारी करणाऱ्यांनी वसुलीसाठी तगादा लावल्याने एका २४ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. अंकुश नंदकिशोर राऊत (वय २४, राहणार लक्ष्मी नगर, मोठी उमरी, अकोला) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर अकोल्यातील दुसऱ्या घटनेत २८ वर्षीय तरुणाने बहिणीच्या साक्षगंधाच्या दिवशीच आत्महत्या केली. निलेश भगवान बोबटे असं या तरुणाचं नाव […]

ताज्याघडामोडी

हिंडेनबर्गचा जोर ‘ओसरला’; अदानीचं जबरदस्त पुनरागमन, शेअर्समध्ये बंपर तेजी

अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी २०२३ रोजी भारतातील प्रतिष्टीत समूहापैकी एक अदानी समूहावर फेरफार आणि फसवणुकीचे आरोप करत धक्कादायक अहवाल प्रकाशित केला. हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आल्यापासून भारतीय शेअर बाजार आणि अदानी समूहातील समभागात खळबळ उडाली. याच्या परिणामी गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत झरझर खाली पडले. पण आ बाजारातील १० सत्रानंतर अदानींच्या स्टॉक्सवरील […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर एम.आय.डी.सी.च्या कामास गती द्या,उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

आ.आवताडेंच्या उपस्थितीत पार पडली अधिकाऱ्यांची बैठक    पंढरपूर शहर व तालुक्याच्या दृष्टीने भौतिक, व्यावसायिक आणि अर्थिक पातळ्यांवर अतिशय महत्वपूर्ण असणारा पंढरपूर एम. आय. डी. सी. प्रश्न गेली अनेक वर्षे भिजत घोंगडे अशा अवस्थेत सापडला होता. सदर एम. आय. डी. सी. साकार झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील निरनिराळ्या विकासात्मक बाबींचा विकास कसा होऊ शकतो यावर फक्त कागदी घोडे नाचवून […]