ताज्याघडामोडी

हिंडेनबर्गचा जोर ‘ओसरला’; अदानीचं जबरदस्त पुनरागमन, शेअर्समध्ये बंपर तेजी

अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी २०२३ रोजी भारतातील प्रतिष्टीत समूहापैकी एक अदानी समूहावर फेरफार आणि फसवणुकीचे आरोप करत धक्कादायक अहवाल प्रकाशित केला. हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आल्यापासून भारतीय शेअर बाजार आणि अदानी समूहातील समभागात खळबळ उडाली. याच्या परिणामी गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत झरझर खाली पडले. पण आ बाजारातील १० सत्रानंतर अदानींच्या स्टॉक्सवरील हिंडेनबर्गचा प्रभाव कमी होताना दिसत आहे.

हिंडेनबर्गचा अहवाल प्रकाशित झाल्यासपासून अदानींच्या समभागात घसरणीचे सत्र सुरूच होते मात्र आज, ८ फेब्रुवारी रोजी अदानीच्या शेअर्सच्या घसरणीला ब्रेक लागला असून गुंतवणूकदार जोरदार खरेदी करताना दिसत आहेत. अशा स्थितीत आता मंगळवारनंतर बुधवारी देखील अदानी समूहाच्या बहुतांश शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळतेय. अदानी समूहाची प्रमुख कंपनी, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स बीएसईवर आज सुरुवातीच्या व्यवहारात १०.२७ टक्क्यांनी वाढून १९८७.६० रुपयांवर पोहोचले असून अदानी विल्मारच्या शेअर्सने आज सलग दुसऱ्या व्यवहारात ५ टक्क्यांनी अप्पर सर्किटला धडक दिली.

सकाळी बाजाराच्या सुरुवातीच्या व्यापार सत्रात अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्समिशन, एसीसी सिमेंट, अंबुजा सिमेंट, अदानी पॉवर, एनडीटीव्ही या कंपन्यांचे शेअर्स तेजीत व्यवहार करताना दिसले. बाजाराच्या सुरुवातीला अदानी एंटरप्रायझेसने १० टक्क्यांनी उसळी घेऊन १९८३.२० रुपयांवर पोहोचले. तर अदानी पोर्टने ५.०४ टक्क्यांनी वाढून ५८१.२० रुपयांवर उसळी घेतली. याशिवाय अदानी विल्मरने बाजार सुरु झाल्यावर ४१९.३५ रुपयांवर पोहोचला. अदानी पॉवरचे शेअर्स १७६.९० (+२.०५%) वर, अंबुजा सिमेंटचा शेअर ३९६ (+३.२१%), अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स १२८९.२० (+३.००%) वर पोहोचले असताना ACC सिमेंटच्या शेअरमध्येही तेजी दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *