ताज्याघडामोडी

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षेसाठी बोर्डाने जारी केले नवे नियम

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अनेक नियम यंदा बदलण्यात आले आहेत. यासोबतच फसवणूक मुक्त परीक्षा आयोजित करण्यासाठी काही कठोर नियमही जाहीर करण्यात आले आहेत. उमेदवाराने परीक्षेचा पेपर चोरल्यास, मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर घेतला, विकत घेतला किंवा पाठवला तर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्याचे निलंबन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्यांची आता गय नाही. राज्य सरकारने १०वी आणि १२वी परीक्षांबाबत एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियम कडक करण्यात आले आहेत. उमेदवाराने परीक्षेचा पेपर चोरल्यास, मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर घेतला, विकत घेतला किंवा पाठवला तर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्याचे निलंबन करण्यात येणार आहे. यासोबतच उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवणी, आलेख, नकाशे, बोर्डाच्या लॉग टेबल्सचा अनधिकृत ताबा आणि वापर केल्यास विद्यार्थी पुढील परीक्षेसाठी अपात्र ठरतील. उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. उपकरणे वापरणे, मंडळाने मान्यता न दिलेले किंवा प्रतिबंधित केलेले साहित्य, परीक्षा हॉलमध्ये ठेवणे. चिथावणीखोर न वाचता येणारी भाषा वापरणे, अपशब्द लिहिणे किंवा धमकी देणे, उत्तरपत्रिकेत बैठक क्रमांक, फोन नंबर, रोमिंग क्रमांक देऊन संपर्क साधण्याची विनंती करणे. विषयाशी संबंधित नसलेला इतर मजकूर लिहिणे, परीक्षा सुरू असताना, हेतूविना उत्तराबाबत इतर परीक्षार्थीशी संपर्क साधणे, एकमेकांकडे पाहून लिहिणे, इतर परीक्षार्थीना तोंडी उत्तरे सांगणे या सर्व गोष्टींवर बंदी असेल. अशा परिस्थितीत दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात/परीक्षादालनात कोणत्याही प्रकारे हत्यार/शस्त्र घेऊन येणे किंवा स्तःजवळ बाळगणे, धमकावणे आणि दहशतव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील पाच वर्षे परीक्षा देता येणार नाही, असे बोर्डाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *