ताज्याघडामोडी

…तर तुमचा पराभव होईल,पोटनिवडणुकीपूर्वी वसंत मोरेंचा शिंदे फडणवीसांना इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका घेण्यात याव्यात अशी भूमिका घेतली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकर घेण्यात यावी, अशी भूमिका मांडली. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा दाखला देत पुणे महापालिकेची निवडणूक घेण्याची मागणी केली. वसंत मोरे यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. प्रशासनाकडून पुण्याचं वाट लावण्याचं काम सुरु असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला.

मनसे नेते वसंत मोरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला एक प्रश्न असल्याच म्हटलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या दोन आमदारांचं नुकतंच निधन झालं. तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या, असं वसंत मोरे यांनी सरकारला म्हटलं. मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे, असं वसंत मोरे म्हणाले.

विकास कामे ठप्प झाली आहेत निधी नसल्यामळे नागरिकांना भेटू वाटत नाही, असंही वसंत मोरे म्हणाले. पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पाहावे आणि हो जर कोणत्या पक्षाला सहनुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार, असंही वसंत मोरे म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *