इंदापूरमध्ये चाकूने सपासप वार करून 33 वर्षांच्या महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.सुनिता यांच्यावर वार केल्यानंतर आरोपीने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सुनिता शेंडे या जानाई लक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा होत्या. तर सुनिता शेंडे यांचे पती दादासाहेब शेंडे हे समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. सुनिता शेंडे यांच्या हत्येमागे पतसंस्थेचा एँगल आहे का? याचा तपासही पोलीस करत आहेत. चाकूने सपासप वार करून हि हत्या करण्यात आली आहे.ज्ञानेश्वर बबन रासकर असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. ज्ञानेश्वरने सुनिता शेंडे यांची हत्या का केली? याचं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. 4 तारखेच्या रात्री ज्ञानेश्वरने निमगाव केतकी सराफवाडी रोडवर सुनिता शेंडे यांची हत्या केली आहे. आरोपी ज्ञानेश्वर रासकर हा इंदापूरच्या सुरवडचा रहिवासी आहे.
Related Articles
वीजबिल वसुली तर थांबवा वीजेअभावी जळालेल्या पिकांचे पंचनामे करून मोबदला द्यावा रासपची मागणी
वीजबिल वसुली तर थांबवा वीजेअभावी जळालेल्या पिकांचे पंचनामे करून मोबदला द्यावा रासपची मागणी थकित वीजबील वसुली करत महावितरणने वीज कनेक्शन तोडत आहेत व सरसकट वीज कपात करत आहेत यामुळे घरगुती तसेच शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. फळबागांसारख्या पिकांना दररोज पाण्याची गरज आहे. तसेच उभी पिके जळायला लागलेली आहेत याला […]
भगिरथ भारत भालके यांचा प्रचाराचा रांझणी, ता.पंढरपूर येथून शुभारंभ
भगिरथ भारत भालके यांचा प्रचाराचा रांझणी, ता.पंढरपूर येथून शुभारंभ पंढरपूर ः 04- मतदार संघातील मंगळवेढा तालुक्यातील 35 गावच्या पाणी प्रश्न हा अंतिम टप्यात असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.श्री जयंतरावजी पाटील यांनी रांझणी, ता.पंढरपूर येथील प्रचार शुभारंभ प्रसंगी सांगितले. श्रीक्षेत्र रांझणी, ता.पंढरपूर येथील श्री शंभू […]
सोमवारी नारायण चिंचोलीत शिवराज्याभिषेक सोहळा व विविध विकास कामांचे भूमिपूजन,लोकार्पण
आ.बबनदादा शिंदे,मा.आ.प्रशांत परिचारक,जि.प.सीईओ दिलीप स्वामी यांची उपस्थिती सूर्यनारायण देवाचे प्राचीन मंदिर असलेले एकमेव तीर्थस्थळ म्हणून ओळख असलेल्या नारायण चिंचोली येथे सोमवार दिनांक ६ जून सकाळी ठीक ९ वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्याच बरोबर विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण माजी आमदार व पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या […]