ताज्याघडामोडी

प्रियकराशी संगनमत करून पतीची हत्या 

पालघरमधील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस खात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. महिला पोलिसानेच आपल्या प्रियकरासह सुपारी देऊन तिच्या पतीला संपवलं. याप्रकरणी पत्नी आणि प्रियकरासह तीन जणांना पालघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकाचा खून झाल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. रिक्षाचालकाची पोलीस पत्नीने अनैतिक संबंधातून कट रचून […]

ताज्याघडामोडी

शिवसेनेचे आमदार रामदास कदम शिवसेनेच्या मंत्र्यावरच संतापले

कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम  यांचा रुद्रावतार नुकताच सभागृहात पाहायला मिळाला. एका पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशी प्रकरणात त्यांनी शिवसेनेच्या (Shivsena) मंत्र्याला खडे बोल सुनावले. शिवसेनेचा मंत्री गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणत आहे. मला विधानभवनाच्या गेटवर उभे राहून आंदोलन करायला लावू नका, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला. अर्थसंकल्पीय अधिवेनशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये हा प्रकार […]

ताज्याघडामोडी

आणखी एका राजकारण्याचे विवाहबाह्य संबध जाहीर करणार, प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार मोर्चेबांधनी सुरू आहे.  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या आणखी एका आमदारावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, शिवसेनेचे मंत्री आणि आमदार संजय राठोड(sanjay rathod) यांच्या नंतर विरोधकांच्या निशाण्यावर […]

ताज्याघडामोडी

शिक्षिकेला कोरोना, 100 विद्यार्थी क्वारंटाईन

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळं अनेकठिकाणी शाळा-कॉलेज बंदच आहेत. जिथं शाळा-कॉलेज सुरू झाली तिथं कोरोनाचा संसर्ग वाढला. अशीच परिस्थिती असेल तर कोरोनाच्या संकटात दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार, असा सवाल आता उपस्थित होतो आहे. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये लक्ष्मीबाई पाटील गर्ल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील एका शिक्षिकेला कोरोनाची लागण झाली. त्यामुळं ज्युनिअर कॉलेजातील 100 हून अधिक विद्यार्थी आणि […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

साताऱ्यात पेट्रोलने भरलेल्या दोन विहिरी

सातारा, 03 मार्च : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागली आहे. चोरांनीही आता पेट्रोलकडे मोर्चा वळवला असून साताऱ्यात पेट्रोल चोरीसाठी चक्क पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईन फोडली आहे. धक्कादायक म्हणजे, पेट्रोल पाईपलाईन तशीच सोडून दिल्यामुळे परिसरातील विहिरीत पेट्रोलच पेट्रोल झाले आहे. पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी पेट्रोल वाहून नेहणारी पाईपलाईन फोडल्याची घटना उजेडात आली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर शिवसेना विस्तार कार्यकारिणी जाहीर   नवीन चेहर्‍यांना व तरुणांना दिली शिवसेनेने संधी…. पंढरपूर कार्याध्यक्षपदी अनिल कसबे तर संघटक पदी गणेश घोडके

पंढरपूर शहर शिवसेना विस्तार कार्यकारिणी जाहीर   नवीन चेहर्‍यांना व तरुणांना दिली शिवसेनेने संधी…. पंढरपूर कार्याध्यक्षपदी अनिल कसबे तर संघटक पदी गणेश घोडके पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहरात शिवसेना वाढीसाठी आज शहर कार्यकारणीचा विस्तार करत नवीन चेहऱ्यांना संधी देऊन पंढरपूर शहरातील प्रत्येक  घराघरात शिवसेना पोहोचवण्या साठी तसेच येणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्य घराघरात रुजवण्यासाठी आज मान्यवरांच्या उपस्थितीत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण, वडिलांची चुलत आजीविरोधात तक्रार

बीड : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. परळी शहर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाच कोटी घेतल्याचा आरोप करून बदनामी केल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. संजय राठोड यांनी पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे […]

ताज्याघडामोडी

दहावी, बारावीच्या परीक्षा होणार नाहीत ?

मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, अशी शक्यता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  यांच्या वक्तक्यामुळे वर्तवली जात आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरू केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या […]

ताज्याघडामोडी

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करा प्रांताधिकारी गुरव यांच्या सूचना

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करा प्रांताधिकारी गुरव यांच्या सूचना               पंढरपूर, दि. 02 :-  जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून चाचण्याचे प्रमाण वाढवा अशा सूचना प्रभारी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या. […]

ताज्याघडामोडी

65  एकर येथील कोविड केअर सेंटरची प्रांताधिकारी यांनी केली पाहणी

65  एकर येथील कोविड केअर सेंटरची प्रांताधिकारी यांनी केली पाहणी                 पंढरपूर, दि. 02 :-  तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या 65 एकर येथील  कोविड केअर सेंटरच्या सुविधांची प्रभारी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी भेट देवून पाहणी केली.         कोविड केअर सेंटर येथे रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची माहिती प्रांताधिकारी गुरव […]