ताज्याघडामोडी

शिवसेनेचे आमदार रामदास कदम शिवसेनेच्या मंत्र्यावरच संतापले

कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम  यांचा रुद्रावतार नुकताच सभागृहात पाहायला मिळाला. एका पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशी प्रकरणात त्यांनी शिवसेनेच्या (Shivsena) मंत्र्याला खडे बोल सुनावले. शिवसेनेचा मंत्री गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणत आहे. मला विधानभवनाच्या गेटवर उभे राहून आंदोलन करायला लावू नका, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला.

अर्थसंकल्पीय अधिवेनशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये हा प्रकार घडला. यावेळी रामदास कदम यांनी म्हटले की, कदम म्हणाले की, कोरोना काळात देवळे आणि शाळा बंद आहेत. पण, रत्नागिरीत दिवसरात्र क्रिकेटला कशी परवानगी मिळते. हजारोंची गर्दी होते. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की शासकीय अधिकारी असून त्यांचे फोटो बॅनरवर लागले. हजारोंच्या गर्दीमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत त्या उपस्थित होत्या. कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. याबाबत फोटोसह गृहमंत्र्यांना सहावेळा पत्र दिले. पण, त्यांना याची दखल घ्यावीशी वाटली नाही. शिवसेनेचे गृह राज्यमंत्री असूनही तेही या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *