ताज्याघडामोडी

पंढरपुर शिवसेनेच्या निवडी जाहीर, शिवसेना सोलापुर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत सर यांनी केले नुतन पदाधिकारी यांचे अभिनंदन.

शिवसेना सोलापुर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत सर यांनी केले नुतन पदाधिकारी यांचे अभिनंदन. शिवसेना पंढरपुर कार्याध्यक्षपदी अनिल कसबे, शिवसेना पंढरपुर संघटकपदी गणेश ( बापू ) घोडके, शिवसेना पंढरपुर सचिवपदी कैलास लोकरे तर शिवसेना पंढरपुर प्रसिद्धीप्रमुखपदी अमित ( पिंटू ) गायकवाड यांच्या निवडी आज पंढरपुर येथे झालेल्या शिवसेना सभासद नोंदणी कार्यक्रमात शिवसेना सोलापुर जिल्हा प्रमुख […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भूमिअभिलेखच्या लाचखोर लिपिकाला चार वर्षे सक्तमजुरी

तक्रारदार यांना फाळणी नकाशाची नक्कल देण्यासाठी 12 हजार रुपयांची लाच मागून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी भूमिअभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक कृष्णात यशवंत मुळीक (वय 47, रा. प्लॉट नं. 16, जेजुरीकर कॉलनी, सिद्धनाथवाडी, वाई) यास येथील विशेष न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी 4 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड व तो न दिल्यास 2 महिने […]

ताज्याघडामोडी

चित्रा वाघ यांना एवढं आक्रमक व्हायचं कारण काय ?

सुरेश खोपडे यांची फेसबुक पोस्ट काय? पूजा चव्हाण मृत्यूचा तपास व्हायला पाहिजे. दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे. पूजाचा मृत्यू म्हटलं तर अपघात किंवा आत्महत्या या दोन शक्यता आज वर आलेल्या बातम्या आणि आरोप वरून वाटते. मी 35 वर्षे पोलिस दलात नोकरी केली. अनुभवी व चाणाक्ष पोलिस अधिकाऱ्याने दोन तास घटनास्थळावर तपास केला तर तो खून आहे […]

ताज्याघडामोडी

पराभूत उमेदवाराकडून नूतन महिला सरपंचास व कटूंबास मारहाण 

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली. यावेळी जनतेतून सरपंच निवड नसल्यामुळे अनेकठिकाणी सरपंचपदासाठी घोडेबाजार झाल्याचे पाहायला मिळाले. यातून अनेक ठिकाणी वाद झाले. पुणे जिल्ह्यातील मोहकल येथे पराभूत उमेदवाराने नवनिर्वाचित सरपंच महिलेला मारहाण केल्याचे समोर आले आहे.सरपंचपदी निवड झाल्यानंतर पराभूत उमेदवाराकडून नवनिर्वाचित सरपंच महिला व त्यांच्या कुटुंबाला घरात घुसुन बेदम मारहाण झाली. खेड […]

ताज्याघडामोडी

सरपंच निवडीवर रोपळे विकास पॅनलचा बहिष्कार

पंढरपूर- तालुक्यातील रोपळे येथील सरपंच पदाच्या निवडीवर रोपळे विकास पॅनलने सलग दुसर्‍या दिवशी बहिष्कार टाकला असून याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नूतन सदस्यांनी दिला आहे.यावेळी रोपळे ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यास प्रमोद गणगे, अनिल कदम, सिध्देश्‍वर भोसेले, विलास भोसले, हनुमंत कदम, विष्णू खरे आदी उपस्थित होते.  रोपळे […]

ताज्याघडामोडी

श्री संत रविदास महाराज यांची जयंती पंढरीत उत्साहात साजरी

श्री संत रविदास महाराज यांची जयंती पंढरीत उत्साहात साजरी.. पंढरपूर प्रतिनिधी- कर्म खंडापासून दूर म्हणून ज्यांनी आपल्या पदान मधुन जगाला निष्काम भक्ती चा संदेश दिला अंधश्रद्धा दूर ठेवण्याचा संदेश दिला त्या महान संत रविदास महाराज यांची जयंती पंढरपूर मधील जुनी पेठ पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशनचा निमित्त आज संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पंढरी वार्ताचे […]

ताज्याघडामोडी

पंतप्रधान आवास योजनेवरची स्थगिती उठवा अन्यथा लाभधारकांना सोबत घेऊन महर्षी वाल्मिकी संघ करणार मोठे जनआंदोलन! -गणेश अंकुशराव लाभार्थ्यांसह आवास योजनेच्या इमारतीवरुन मारणार उड्या

पंतप्रधान आवास योजनेवरची स्थगिती उठवा अन्यथा लाभधारकांना सोबत घेऊन महर्षी वाल्मिकी संघ करणार मोठे जनआंदोलन! -गणेश अंकुशराव लाभार्थ्यांसह आवास योजनेच्या इमारतीवरुन मारणार उड्या!! पंढरपूर (प्रतिनिधी):- भुवैकुंठ पंढरी नगहरीत गेल्या कित्येक वर्षांपासुन पंढरी नगरीत वास्तव्यास असलेलल्या परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अद्यापही स्वत:च्या घराचं स्व्प्नं साकारु न शकलेल्या हजारो बेघरांना स्वत:च्या हक्काचं घर मिळावं या उद्दात्त […]

ताज्याघडामोडी

सोमवार पासून पंढरपूर नगरपरिषदे समोर खोकेधारकांचे आमरण उपोषण

सोमवार पासून पंढरपूर नगरपरिषदे समोर खोकेधारकांचे आमरण उपोषण पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर नगरपरिषदे ने जाहीर केलेली जा.क्र./पंनपं/नअ/ ४३२/२०२१ दि.९/२/२०२१ व फेरनिविदा जा.क्र./ पंनपं ./ न अ / ४९९ / २०२१ दि.१५/०२/२०२१ ही निविदा रद्द करावी व त्या संबंधित जागेवर नगरपरिषदेकडून तयार करण्यात येणारी लोखंडी दुकाने अस्तित्वात असलेल्या व्यावसायिकांना प्रथम प्राधान्याने अत्यल्प भाड्याने देण्यात यावीत, तसेच पंढरपूर […]

ताज्याघडामोडी

दिवगंत आमदार भारत भालके यांच्या कुटूंबीयांना विधानमंडळाचे स्मृतीपत्र सुपूर्द

  पंढरपूर, दि. 27 :-महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा व विधानपरिषदेतील विद्यमान सदस्य अथवा माजी सदस्यांचे दु:खद निधन झाल्यास त्या निधनाबद्दल संबधित सभागृहात शोक प्रस्ताव संमत करुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येते. त्याअनुषंगाने विधानमंडळाने तयार केलेले स्मृतीपत्र दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांना स्मृतीपत्र […]

ताज्याघडामोडी

कुसुमाग्रजांच्या साहित्यामुळे भारताबाहेर देखील मराठी भाषेला विशेष महत्व   – अध्यक्ष डॉ.विजय कुलकर्णी स्वेरीमध्ये ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा

पंढरपूर- ‘कुसुमाग्रजांच्या मराठीतील साहित्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर भारताबाहेर देखील मराठी भाषेला विशेष महत्व प्राप्त झाले असून कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्यातील अदभूत लेखनातून ‘मराठी भाषा’ ही जागतिक स्तरावर पोहचवली आहे. आज आपल्याला मातृभाषेमुळेच भाषेची गोडी निर्माण होवून मनातील असणाऱ्या भावना अधिक उत्कटपणे प्रकट करता येतात. म्हणून मराठी भाषा ही आता अधिक समृद्ध झाली पाहिजे.’ असे प्रतिपादन स्वेरी डिप्लोमाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे […]