ताज्याघडामोडी

सोमवार पासून पंढरपूर नगरपरिषदे समोर खोकेधारकांचे आमरण उपोषण

सोमवार पासून पंढरपूर नगरपरिषदे समोर खोकेधारकांचे आमरण उपोषण

पंढरपूर प्रतिनिधी

पंढरपूर नगरपरिषदे ने जाहीर केलेली जा.क्र./पंनपं/नअ/ ४३२/२०२१ दि.९/२/२०२१ व फेरनिविदा जा.क्र./ पंनपं ./ न अ / ४९९ / २०२१ दि.१५/०२/२०२१ ही निविदा रद्द करावी व त्या संबंधित जागेवर नगरपरिषदेकडून तयार करण्यात येणारी लोखंडी दुकाने अस्तित्वात असलेल्या व्यावसायिकांना प्रथम प्राधान्याने अत्यल्प भाड्याने देण्यात यावीत, तसेच पंढरपूर नगरपरिषदेकडे दिनांक १५/०२/२०२१ रोजी दिलेले आमच्या निवेदनात नमूद करण्यात आलेल्या आमच्या मागण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करणेकामी आपणआपला अहवाल सक्षम समितीसमोर सादर करण्यात येत असल्याचे आपल्याकडील जा. नं./पंनपं/ न अ/५२२/२०२१ दिनांक १७/०२/२०२१ नुसार कळविले होते. या समितीचा निर्णय येईपर्यंत पंढरपूर नगरपरिषदेकडून उपरोक्त निविदा रद्द केल्याचे जाहीर होणे अपेक्षित होते. परंतू पंढरपूर नगरपरिषदेकडून अद्याप उपरोक्त निविदा रद्द केल्याचे जाहीर केले नाही. त्यामुळे आम्हा गरीब बेरोजगार व्यावसायिकांचा हक्क हिरावून आमची दुकाने धनदांडग्यांच्या हवाली करण्याचे कारस्थान या निविदेमार्फत होत असल्याची दाट शक्यता वाटू लागली आहे. म्हणून ही निविदा ताबडतोब रद्द करावी व त्या जागेवर नगरपरिषदेकडून तयार करण्यात येणारी लोखंडी दुकाने पंढरपूर नगरपरिषद सर्वसाधारण
सभा ठराव क्र.६६ (अ. वि.क्र.११) दि. १८/०७/२०१८ यास आधीन राहून अस्तित्वात असलेल्या व्यावसायिकांना प्रथम प्राधान्याने अत्यल्प भाड्याने देण्यात यावीत या न्याय्य मागणीसाठी मुख्याधिकारी कार्यालयासमोर सोमवार दिनांक ०१/०३/२०२१ पासून आमरण उपोषण सुरू करीत असल्याचे खोकेधारकांकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. संबंधित निवेदनाच्या प्रती नगर विकास मंत्री, नगर विकास राज्य मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना ही देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *