ताज्याघडामोडी

श्री संत रविदास महाराज यांची जयंती पंढरीत उत्साहात साजरी

श्री संत रविदास महाराज यांची जयंती पंढरीत उत्साहात साजरी..

पंढरपूर प्रतिनिधी- कर्म खंडापासून दूर म्हणून ज्यांनी आपल्या पदान मधुन जगाला निष्काम भक्ती चा संदेश दिला अंधश्रद्धा दूर ठेवण्याचा संदेश दिला त्या महान संत रविदास महाराज यांची जयंती पंढरपूर मधील जुनी पेठ पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशनचा निमित्त आज संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पंढरी वार्ताचे संपादक राजाभाऊ शहापूरकर यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले अशी माहिती संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.

 

यावेळी बोलताना राजाभाऊ शहापुरकर म्हणाले ठाईची बसुनी करा एकचित्त आवडी आनंत आळवावा संत तुकोबारायांनी कुठलेही करमठ विधी न करता जसा परमेश्वराच्या भक्तीची आराधनेचा एक मंत्र दिला तसाच आणि अंधश्रद्धेवर प्रहार करणारा संदेश देणारे संत महान संत ते म्हणजे आपले रविदास महाराज आज आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या कार्याची प्रशंसा करतो परंतु संत रविदास महाराजांनी हे कार्य परमेश्वराच्या भक्ती करताना परमेश्वराच्या आराधना करताना सुद्धा अतिशय सक्षम पणे आणि त्या काळातील कर्मठ विचारांचा विरोध झुगारून हे काम पार पडलं होतं आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या देशाला धर्माला गरज आहे ती अशा कर्मठ विचारातून मुक्त होऊन परमेश्वराच्या नितांत आणि निरपेक्ष भक्तीची आणि कर्मकांड दूर करून केल्या जाणाऱ्या भक्तीची आणि त्याचा सर्वात मोठा संदेश या देशाला देणारे संत रविदास महाराज यांची जयंती आज पंढरपूर मध्ये येथे पांडुरंग तात्या माने फाउंडेशन च्या वतीने साजरी होत आहे आणि या ठिकाणी या सर्व उपस्थित बांधवांनी संत रविदास यांचा जो आदर्श विचार मनात बाळगून उपक्रम साजरा केला त्याला माझ्या मनःपूर्वक शुभेच्या..

यावेळी महर्षी वाल्मिकी संघ संस्थापक गणेश अंकुशराव म्हणाले पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशन वर्षभरामध्ये अनेक महापुरुषांच्या जयंत्या साजरा करतो आणि त्या फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम या पंढरपूर शहरांमध्ये चालू असतात आज संत रविदास यांची जयंती आहे मी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने व पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशनच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि असेच चांगले उपक्रम महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या कराव्यात यासाठी मी शुभेच्छा देतो. कार्यक्रमास संपादक राजाभाऊ शहापुरकर, गणेश अंकुशराव, संस्थापक निलेश माने ,गणेश माने, उमेश जाधव, प्रसाद कोळी, श्रीनिवास उपळकर, पिंटू शिंदे, महेश माने, शकील मुलाणी, तन्मय अधटराव, नागेश मिसाळ, ओंकार कटकमवार व आदी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *