गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रुग्णाला मृत घोषित केल्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या समर्थकांची हॉस्पिटलमध्ये तोडफोड

पुणे, 26 एप्रिल : हॉस्पिटलच्या दारात कार्डियाक रुग्णवाहिकेतच रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण करुन हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. पुण्यातील कोंढव्यातील प्राइम हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. राष्ट्रवादी नगरसेवक गफूर पठाण आणि त्यांच्या समर्थकांनी आक्रमक होत ही तोडफोड केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील प्राइम हॉस्पिटलमध्ये डॉ. तोतला हे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हॉस्पिटलला […]

ताज्याघडामोडी

मोफत लस देण्यावरून महाविकास आघाडीत धुसफूस, राष्ट्रवादीच्या घोषणेनं वाद?

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी महाविकासआघाडी राज्यात मोफत लस देईल आणि याबाबत केबिनमध्ये निर्णय होईल असे बोलून दाखवले त्यानंतर मग सायंकाळी शिवसेनेचे नेते कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला लस देणे सरकारची भूमिका आहे, त्यामुळे लोकांना मोफत लस देण्याचे सूचक वक्तव्य केले होते. पण काही क्षणातच आदित्य ठाकरे यांनी स्वतःचे […]

ताज्याघडामोडी

पुढचे चार दिवस महत्त्वाचे

मुंबई : एकीकडे उन्हाच्या झळा वाढत असताना आगामी चार दिवस म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत मध्य भारतासह महाराष्ट्रात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापूर्वी 11 एप्रिल रोजी राज्यात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, परभणी या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला होता. त्यानंतर आता पुन्हा आगामी 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता […]

ताज्याघडामोडी

होय, आजही प्रामाणिजपणा जिवंत आहे!

अमरावती : एखादी अमानवीय घटना घडली की लगेच लोक म्हणतात माणुसकी कुठे आहे. संपली माणुसकी असे लोक सहज म्हणून देतात पण आजही माणुसकी जिवंत असणाऱ्या घटना गोष्टी आपण कोरोना काळात अनुभवतोय. माणुसकीचा व प्रामाणिकतेचा परिचय देणारी एक घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात समोर आली आहे. शासनाच्या रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुराला सोडलेले 97 हजारांच्या पाचशे […]

ताज्याघडामोडी

पुन्हा एकदा नकोसा जागतिक विक्रम!

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा उद्रेक रोज नव्या पातळीवर पोहचत असल्याचे दिसत आहे. रोज कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतानाच दिसत आहे. दरम्यान, मागील २४ तासात पुन्हा एकदा देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशात एका दिवसात सुमारे साडेतीन लाख नवीन रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. झाली आहे. ही आतापर्यंतची […]

ताज्याघडामोडी

कोवॅक्सिन लसीची किंमत जाहीर

अखेर भारत बायोटेकने कोवॅक्सिन लसीची किंमत देखील जाहीर केली आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांना ही लस कोविशिल्डपेक्षा दुप्पट किंमतीला घ्यावी लागणार आहे. भारत बायोटेकने शनिवारी रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट टाकून घोषणा केली आहे. राज्य सरकारांसाठी कोवॅक्सिनलशी किंमत ही 600 रुपये असणार आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये याच लशीचा दर हा 1200 रुपये असणार आहे. तर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

टपली मारल्याच्या रागातून पैलवानाचा खून

पुणे -येता जाता टपल्या मारल्याच्या रागातून पैलवानाचा कुऱ्हाड आणि तलवारीने वार करून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील अल्पवयीन चौघांसह सात जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी 48 तासांत ताब्यात घेतले. ही घटना बुधवारी रात्री गणराज चौकाजवळ घडली. सचिन तानाजी वाघमारे (22), सोमनाथ दत्तात्रय गाडे (25, दोघे रा.आंबेगाव पठार), तुषार जालिंदर सरोदे (25, रा. कात्रज) अशी अटक आरोपींची […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! डॉक्टरचा घरात आढळला मृतदेह; बेशुद्ध बहिणीचाही अंत

पुणे : डेक्कन येथील प्रभात रस्ता परिसरातील घरामध्ये डॉक्‍टर मृतावस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तर त्यांची बहिण घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आली, पोलिसांनी तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केली. मात्र उपचारादरम्यान बहिणीचाही मृत्यु झाला. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. डॉ.सुबीर सुधीर रॉय (वय 68, रा. श्‍वेता टेरेस, भोंडे कॉलनी, प्रभात रोड, डेक्कन), […]

ताज्याघडामोडी

लॉकडाऊनमुळे दुकानं बंद, दारूची तहान सॅनिटायझरनं भागवली; 7 जणांचा मृत्यू

यवतमाळ, 24 एप्रिल: सध्या राज्यात कोरोना विषाणू वेगात पसरत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. परिणामी दारूची दुकानं बंद असल्यानं अनेकांनी दारुला पर्याय म्हणून सॅनिटायझर प्यायला सुरुवात केली आहे. यवतमाळमधून अशीच एक घटना समोर आली आहे. येथील काही लोकांनी गावात दारू मिळत नसल्यानं सॅनिटायझरचं प्राशन केलं आहे. त्यामुळे सात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीच्या “या” आमदारावर हनी ट्रॅपचा प्रयत्न;गुन्हा दाखल

पुणे जिह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी हनी ट्रॅपचा प्रयोग करणाऱ्या तिघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि.पुणे), राहूल किसन कांडगे (रा. चाकण,जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार एका युवतीमुळे उघडकीस आला असून, […]