ताज्याघडामोडी

होमगार्ड्स बाबत महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण निर्णय! देवेंद्र फडणवीसांची घोषणा

होमगार्ड अर्थात राज्य गृहरक्षक दलातील गार्डना आता सलग सहा महिने काम दिलं जाणार आहे आणि त्यासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दर तीन वर्षांनी केली जाणारी त्यांची नोंदणी आता बंद करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो होमगार्डना होणार आहे. होमगार्ड ही स्वेच्छित सेवा […]

ताज्याघडामोडी

स्वेरीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन व एमबीए यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि एमबीए या विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘आयआरपी-पेटेंट, डिझाईन, ट्रेडमार्क आणि कॉपी राईट’ या विषयावर दि.१७ जुलै ते २२ जुलै २०२३ दरम्यान एक आठवड्याचा ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न झाला.        दीप प्रज्वलनानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांनी प्रास्ताविकात या आठवडाभर चालणाऱ्या ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ आयोजनाचा हेतू व संशोधनासाठी […]

ताज्याघडामोडी

दांपत्याने चुलत भावाला लोकेशन पाठवत शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बोलवले; समोरचे दृश्य पाहून बसला धक्का

आंतरजातीय प्रेम विवाह केलेल्या दांपत्याने आपल्या चुलत भावाला लोकेशन पाठवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. करवीर तालुक्यातील इस्पुर्ली येथील एका शेतातील पत्र्याचे शेडमध्ये त्यांनी गळफास लावून घेतला असून गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. राहुल राजाराम परीट (वय २३) आणि अनुष्का राहुल परीट (वय-२१) असे मृत दांपत्याचे नाव आहे. जानेवारी महिन्यातच राहुल परीट याचा […]

ताज्याघडामोडी

तीन महिन्यापूर्वी लग्न, घरात कुणी नसताना टोकाचा निर्णय

जळगाव सुप्रिम कॉलनीतील तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल गुरूवारी दुपारी २ वाजता समोर आली आहे. तरुणाच्या आत्महत्या करण्यामागचे कारण समोर आलेलं नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पवन अमरसिंग पवार (वय ३० रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) असं मयत तरूणाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या दोन विद्यार्थ्यांची ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या कंपनीत निवड

‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.          अॅटोमोटिव्ह क्षेत्राशी संबंधीत असलेल्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इंजिनिअरिंगच्या महेश सुनील देशमुख व ऋतुजा […]

ताज्याघडामोडी

चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डीत आरोग्य,नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचा येथे १ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने पंढरपूर तालुक्यात तसेच पंचक्रोशीत विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले असता आज दिनांक २७जुलै रोजी खर्डी येथे रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर व नेत्रदान तपासणी शिबिराचा लाभ नागरिकांनी घेतला. ज्यांनी सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेताच्या बांधावरच घडली धक्कादायक घटना, वाद विकोपाला गेल्यावर झाडली गोळी, बापलेकाचा गेला जीव

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मलगाव येथे शेतीच्या बांधावरून झालेल्या वादादरम्यान थेट गावठी कट्ट्याने फायरिंग करण्यात आली आली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तर यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील मलगावचा पिपलीपाडा येथे दोन परिवारांमध्ये हा वाद झाल्याचे […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या दोन विद्यार्थिनींची ‘डेलॉइट’ या कंपनीत निवड

‘डेलॉइट’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील दोन विद्यार्थिनींची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.          आय.टी. क्षेत्राशी संबंधीत लंडन येथे मुख्यालय असलेल्या ‘डेलॉइट’ या बहुराष्ट्रीय कंपनी कडून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीच्या […]

ताज्याघडामोडी

“न्यु सातारा’ चे विद्यार्थी अमोल मुडे व अश्विनी गवळी यांची Tata Motors pvt.ltd.pune या कंपनीत निवड

पंढरपूर कोर्टी- येथील न्यू सातारा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या मुलाखतीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील एका विद्यार्थ्यांची व  इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉमुनिकेशन विभागातील एका विद्यार्थिनीची Tata Moters Pvt.Ltd pune या कंपनीत निवड झाली आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री .राजाराम निकम साहेब यांनी दिली. न्यू सातारा  महाविद्यालयाच्या स्थापनेपासून प्लेसमेंटच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात आल्या आहेत. […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा; ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतो आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे. अशात मध्यंतरी काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे दुबार पेरणीचं संकटही ओढावलेलं. मात्र, आता सातत्याने होत असलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती ओढावली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशात […]