ताज्याघडामोडी

स्वेरीच्या दोन विद्यार्थिनींची ‘डेलॉइट’ या कंपनीत निवड

डेलॉइट’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील दोन विद्यार्थिनींची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

         आय.टी. क्षेत्राशी संबंधीत लंडन येथे मुख्यालय असलेल्या डेलॉइट’ या बहुराष्ट्रीय कंपनी कडून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीच्या निवड समितीने अंतिम फेरीतून इंजिनिअरिंगच्या अंकिता बालाजी ताटीपामुल व विशाखा विजयकुमार सावळकर या दोन विद्यार्थिनींची निवड केली  असून त्यांना प्रत्येकी वार्षिक रु.४ लाख इतके पॅकेज मिळाले आहे. विद्यार्थ्यांचे परिश्रमशिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूडकम्युनिकेशन स्किलएडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंगमॉक इंटरव्यूवग्रुप डिस्कशनसॉफ्टवेअर ट्रेनींग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरईटोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते.सदर विद्यार्थिनींना  महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगेसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगेउपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारीस्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवारस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी यांच्यासह पालकांनी डेलॉइट’ कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या अंकिता  ताटीपामुल व विशाखा सावळकर यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *