ताज्याघडामोडी

“न्यु सातारा’ चे विद्यार्थी अमोल मुडे व अश्विनी गवळी यांची Tata Motors pvt.ltd.pune या कंपनीत निवड

पंढरपूर कोर्टी- येथील न्यू सातारा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या मुलाखतीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील एका विद्यार्थ्यांची व  इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉमुनिकेशन विभागातील एका विद्यार्थिनीची Tata Moters Pvt.Ltd pune या कंपनीत निवड झाली आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री .राजाराम निकम साहेब यांनी दिली.

न्यू सातारा  महाविद्यालयाच्या स्थापनेपासून प्लेसमेंटच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात आल्या आहेत. न्यू सातारा महाविद्यालयाचे विद्यार्थी आज विविध कंपन्यांमध्ये आपले उत्तम करिअर घडवीत आहेत .न्यू सातारा महाविद्यालयामध्ये वार्षिक परीक्षांचे उत्कृष्ट निकाल,  मानांकने ,संशोधने याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंट कडे देखील अधिक लक्ष दिले जाते. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि न्यू सातारा महाविद्यालयातील शैक्षणिक कल्चर यामुळे न्यू सातारातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. यामुळे पालक वर्गात सुद्धा आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 त्यांच्या याच यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. राजाराम निकम साहेब व संस्थेचे प्रतिनिधी शेडगे साहेब, प्राचार्य विक्रम लोंढे सर, उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड सर ,सर्व विभाग प्रमुख तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *