मुंबई – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लागू असलेला लाॅकडाऊन 1 जूननंतर उठवला जाईल की पुन्हा वाढवला जाईल यावर सर्व स्तरांत चर्चा सुरु असताना यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लाॅकडाऊन वाढवण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. आज कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरसकट लाॅकडाऊन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची […]
ताज्याघडामोडी
सख्खा भाऊ पक्का वैरी, प्रॉपर्टीच्या वादातून आईला शिवीगाळ, भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉड घालुन केली हत्या
उल्हासनगरात मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावाने भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सख्खा भाऊ संपत्तीच्या वादातून इतक्या टोकाचा निर्णय कसा घेऊन शकतो? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना सतावत आहे. नेमकं काय घडलं? संतोष कदम असं […]
मानाच्या सात पालखी सोहळा प्रमुखांसोबत आषाढी सोहळ्याबाबत उद्या अजित पवार विशेष बैठक घेणार
पुणे – करोनाच्या संकटामुळे मागील वर्षी आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्याऐवजी एसटी बसने पालखी पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या. यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आग्रही आहे.वारकरी संप्रदायाने यंदा मर्यादित स्वरूपात, करोनाचे सर्व नियम पाळून वारकऱ्यांना पायी पालखी सोहळ्यासाठी परवानगी द्यावी, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. पंढरपूर येथे प्रातांधिकारी यांच्यासोबत […]
मुख्यमंत्री पवारांना म्हणाले, सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे पवार यांना सांगितले. गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत झालेली खडाजंगी, काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरून केलेली […]
१ जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरू झालाच पाहिजे ! व्यापारी संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई | राज्यातील कोरोनासंदर्भातील सरकारने जाहीर केले निर्बंध १ जून रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे याच दिवसापासून सर्वच व्यापार पूर्ण वेळ सुरू करण्यासाठी परवानगी मिळालीच पाहीजे अशी आग्रही मागणी ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ चे राष्ट्रीय संगठन मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. नाहीतर […]
बँकेची कामे वेळेत उरकून घ्या,जून महिन्यात तब्बल ९ दिवस बँका बंद राहणार, पाहा सुट्ट्यांची यादी
जर तुम्हाला बँकांची कामे उरकायची असतील तर एकादा जून महिन्याचे कॅलेंडर पाहूनच बाहेर पडा. कारण जून महिन्यात तब्बल नऊ दिवस बँका बंद असणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर जून महिन्यात नऊ दिवस बँकांचे कामकाज पूर्णपणे बंद असणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारचा देखील समावेश आहे. आरबीआयद्वारे जाहिर केलेल्या सुट्ट्या सगळ्या […]
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा खून; मृतदेह गाडीत जाळण्याचा प्रयत्न
पुणे – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात हा प्रकार घडला आहे. धामणी येथील पारगाव अवसरी जिल्हा परिषद गट अध्यक्ष सचिन जाधव असे हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून खून झाला आहे. या घटनेची नोंद मंचर पोलिसात करण्यात आली आहे. बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी अशी […]
बलात्काराच्या खोट्या केसची धमकी देत पैशाची मागणी
घाटकोपरमध्ये रहाणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणाला त्याच्या अट्टल गुन्हेगार असलेल्या मित्राने एक टोळीच्या मदतीने हनी ट्रॅपमध्ये अडकवलं होतं. काही दिवसांपूर्वी त्याच्या फोनवर एक अज्ञात तरुणीचा फोन आला. त्या तरुणीने पीडित तरुणाशी ओळख वाढवली. त्यानंतर ते एकमेकांना लॉजवर भेटले. लॉजबाहेर येताच तरुणीच्या साथीदारांनी त्याला अपहृत केले आणि तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितली.पैसे दिले नाहीत तर तुझ्यावर […]
शरद पवार आणि खा.संभाजीराजे यांच्यात अवघ्या १० मिनिटाची भेट
मुंबई: मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी त्यामधून काहीही साध्य होणार नाही, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केले. एकीकडे संभाजीराजे शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हणतात. मात्र, अवघ्या 10 मिनिटांच्या या भेटीत मराठा आरक्षण, नोकऱ्या, सारथी या सर्व विषयांवर चर्चा कशी काय होऊ शकते, असा सवाल […]