पुणे – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात हा प्रकार घडला आहे. धामणी येथील पारगाव अवसरी जिल्हा परिषद गट अध्यक्ष सचिन जाधव असे हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून खून झाला आहे. या घटनेची नोंद मंचर पोलिसात करण्यात आली आहे.
बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी अशी आरोपींची नावे असून त्यांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्याच पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात ही हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून हा वाद झाला असून काल रात्री सचिन जाधव यांचे बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांच्याशी कडाक्याचे भांडण झाले.