शेतात पिकवलेला कांद्याला योग्य भाव मिळाला नाही, त्यामुळे हातात पैसा देखील आला नाही, घरात नऊ जणांची खांद्यावर जबाबदारी, यातच लोकांकडून घेतलेले कर्ज फेडायचं कसं याची विवंचना, या कारणावरुनच बीडमधील युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे.संभाजी अर्जुन अष्टेकर असे टोकाचे पाऊल उचललेल्या २५ वर्षीय तरुणाचे नाव आहे. आज आपल्या शेतात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याची […]
ताज्याघडामोडी
सरकारी अधिकाऱ्यावर हात उगारणं भोवलं, आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा
प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू हे तुरुंगात जाणार की उच्च न्यायालयात दाद मागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, कोर्टाच्या निकालामुळे बच्चू कडू यांची डोकेदुखी वाढली असून […]
तलावात सापडली 2.57 कोटींच्या किमतीची सोन्याची 40 बिस्कीटं! समोर आली धक्कादायक माहिती..
पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील कल्याणी सीमा चौकी परिसरात एका तलावातून सुमारे 2.57 कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे बीएसएफने जप्त केली आहेत. विशिष्ट माहितीच्या आधारे सोन्याचा शोध घेण्यासाठी बीएसएफच्या पथकाने सोमवारी एका तलावात शोध मोहीम हाती घेतली, त्यावेळी त्यांच्या हाती हे घबाड हाती लागले. तळ्यात 40 सोन्याची बिस्किटे सापडली आहेत. जप्त केलेल्या सोन्याची बाजारातील किंमत सुमारे 2.57 […]
प्रेयसीबद्दल अपशब्द उच्चारल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा खून, दोन सख्ख्या भावांना अटक
प्रेयसी बाबत वडिलांनी अपशब्द उच्चारल्याच्या रागातून मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर वडिलांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचला.मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात सत्य समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन दोन भावांना अटक केली आहे. हा प्रकार दिघी येथे रविवारी (दि.5) रात्री नऊच्या सुमारास घडला आहे. अशोक रामदास जाधव (वय-45 रा. दिघी) असे खून झालेल्या […]
पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीत फसवणूक; 10 उमेदवारांविरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा
पोलीस भरतीदरम्यान मरोळ येथील मैदानावर शारीरिक मैदानी चाचणीत सहभागी काही उमेदवारांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून मैदानी चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी गैरमार्ग पोलीस भरती प्रक्रियेत काही उमेदवार वापर करत असल्याचे आढळले आहे. हा गैरव्यवहार ट्रिगर अलर्टच्या पद्धतीमुळे उघडकीस आला आहे. मुंबई पोलिसांनी सर्व उमेदवारांना पीईटी भरती दरम्यान त्यांची निष्पक्ष आणि प्रामाणिक […]
पुढचे काही तास धोक्याचे! महाराष्ट्राच्या या भागांमध्ये गडगडाटासह पाऊस बरसणार
“महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात झालेल्या पावसामुळे काढणीला आलेली पिकं आणि फळं भुईसपाट झाली आहेत. त्यातच आता पुढच्या काही तासात महाराष्ट्रात गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुणे आणि रायगडच्या घाट परिसरात पुढच्या दोन तासात गडगडाटासह पाऊस पडण्याचा […]
पोटच्या मुलांनी वृद्धाश्रमात टाकलं, बापाने धडा शिकवला, करोडोंची संपत्ती सरकारला केली दान
पोटच्या मुलांनी वडिलांचा सांभाळ करायला नकार दिला, वृद्धाश्रमात टाकलं. निराश झालेल्या वडिलांनी त्यांची संपूर्ण संपत्ती राज्यपालांच्या नावे केली आहे. इतकंच नव्हे तर मृत्यूनंतर अंतिम संस्कार हे मुलाच्या हातून होऊ नयेत, असंही मृत्यूपत्रात म्हटलं आहे. बुढाना येथील ८५ वर्षीय नत्थू सिंह यांनी आपल्या लेकाला धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. नत्थू सिंह गेल्या सात महिन्यांपासून वृद्धाश्रमात […]
भाजीवाल्याच्या खात्यात 172 कोटी! बँक बॅलन्स पाहून आयकर अधिकारीही हबकले
गाझीपूर येथील एका भाजी विक्रेत्याला १७२.८१ कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी इन्कम टॅक्स रिटर्नन न भरल्यामुळे आयकर विभागाने नोटिस जारी केली आहे. विनोद रस्तोगी असं या भाजी विक्रेत्याचे नाव आहे.आयकर विभागाच्या नोटिसबाबत व बँक खात्यातील रक्कमेबाबत त्याला काहीच ठावूक नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. तसंच, कोणीतरी त्याची कागदपत्रे वापरुन बँक खाते उघडल्याचा दावा त्याने केला आहे. विनोद रस्तोगी […]
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी पांडुरंग सुर्यवंशी तर सरचिटणीस पदी आनंद टेके
दि.०६/०३/२०२३ रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ माळशिरस तालुका कार्यकारिणी निवड पंचायत समिती माळशिरस येथे संपन्न झाली. त्यामध्ये श्री. पांडुरंग सुर्यवंशी यांची माळशिरस तालुका अध्यक्ष म्हणुन तर श्री. आनंद टेके यांची सरचिटणीस म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी डाॕ. रामचंद्र मोहिते, ग्रामीण पाणी पुरवठा उप विभागाचे उप अभियंता श्री. बाबर […]
रस्त्यावर ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; ७ किलोमीटर पाठलाग करून टोळक्याने तरुणाला संपवलं
एकीकडे संपूर्ण राज्यभरात होळीचा सण साजरा केला जात असताना दुसरीकडे खुनाच्या घटनेने नाशिक हादरलं आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात एका तरुणाची भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिकमधील शनी मंदिर परिसरातील रहिवासी असलेला किरण गुंजाळ (२७) याची दिंडोरी नाक्यावर असलेल्या […]