ताज्याघडामोडी

पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीत फसवणूक; 10 उमेदवारांविरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा

पोलीस भरतीदरम्यान मरोळ येथील मैदानावर शारीरिक मैदानी चाचणीत सहभागी काही उमेदवारांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून मैदानी चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी गैरमार्ग पोलीस भरती प्रक्रियेत काही उमेदवार वापर करत असल्याचे आढळले आहे.

हा गैरव्यवहार ट्रिगर अलर्टच्या पद्धतीमुळे उघडकीस आला आहे. मुंबई पोलिसांनी सर्व उमेदवारांना पीईटी भरती दरम्यान त्यांची निष्पक्ष आणि प्रामाणिक कामगिरी करण्याचे आवाहन केले आहे. गैरव्यवहारात सहभागी होऊ नका, यामुळे त्यांची प्रक्रियेतून अपात्रता तर होईलच शिवाय त्यांच्यावर गुन्हाही नोंदवला जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *