Uncategorized

सावरकर चौकातील रोजच्या वाहतुक कोंडीला नागरिक वैतागले

पंढरपूर शहरातील सर्वात जास्त वर्दळीचा चौक समजल्या जाणार्या सावरकर चौकात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे या परिसरातून ये-जा करणार्या अबालवृध्दांना व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.शहराचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने व नविन व जुन्या बसस्थानकाकडे जाणार्या प्रवाशांची संख्या मोठी असून राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.बसेस याच मार्गाने ये-जा करीत असतात.येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर […]

Uncategorized

तलाठी कार्यालय बंद,अनेक गावातील भाऊसाहेब नॉट रिचेबल,हेलपाटे मारून ग्रामस्थ बेजार 

तलाठी,मंडल अधिकारी,ग्रामसेवक हे शासनाच्या नियमानुसार निवासी पदे आहेत.सदर पदाची भरती करतानाच शासनाने नमूद केलेल्या अटींमध्ये कर्तव्याच्या ठिकाणी निवासी रहावे लागेल असे स्पष्टपणे नमूद केलेले असते.मात्र बहुतांश तलाठी,मंडळ अधिकारी व ग्रामसेवक हे कर्तव्याच्या ठिकाणी निवासी रहात नसल्याने ग्रामिण जनतेला मोठया अडचणींचा सामना करावा लागतो.ग्रामस्थांना आपल्या कामासाठी संपर्क करुन तलाठी,मंडल अधिकारी अथवा ग्रामसेवक हे जेथे असतील तेथे […]

Uncategorized

भरधाव वेगातील ट्रॅक्टरच्या धडकेत वृद्ध मोटारसायकल चालक जागीच ठार 

https://youtu.be/BEuF1nCyOIQ पंढरपूर ते वाखरी रस्त्यावरील लाईफ लाईन मेडिकल समोर सायंकाळी साडेसहाच्या आसपास भरधाव वेगातील ट्रॅक्टरने दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिल्याने प्रभु श्रीमंत चौधरी वय 72 वर्ष रा.नवीन सातारा नाका,स्वामी समर्थ नगर पंढऱपुर या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अज्ञात ट्रक्टर चालाकविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 279,304(अ),427व मोटार वाहन कायदा कलम 183,184,134 प्रमाणे गुन्हा […]

Uncategorized

दारुच्या नशेत महाशिवरात्रीची पूजा

वर्धा : महादेवाचे त्रिशूळ वर्ध्यातील वृद्धासाठी मृत्यूचा फास ठरले. त्रिशूळात मान अडकल्यामुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुच्या नशेत पूजा करताना हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Uncategorized

मंगळवेढ्यातील देगाव ग्रामपंचायतीस अभिजित पाटील यांच्या हस्ते हरित ग्राम सन्मान पुरस्कार प्रदान 

जागतिक महिला दिनानिमित्त देगाव येथे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. गावाचा विकास हा लोकसहभागातून व्हावा या उद्देशाने गावात सोलापूर सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यामध्ये नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन गावात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करत सदर वृक्षांचे उत्तमरीत्या संवर्धनही केले. त्यामुळे देगावला श्री.अभिजीत पाटील यांच्या हस्ते “ग्रामपंचायत […]

Uncategorized

पंढरपूर तालुक्यातील वृक्ष लागवडीची चौकशी होणार ?

राज्य विधिमंडळात ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेच्या चौकशीचे आदेश निघाले असून यासाठी १६ आमदारांच्या विशेष चौकशी  समितीही घोषणा करण्यात आली आहे.सोलापूर जिल्ह्यात जुलै २०१९ मध्ये वनविभागाकडून ८५ लाख ५२ हजार वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले होते व यासाठी ९० लाख रोपांची निर्मितीही करण्यात आली होती.   वन विभागाच्या नियोजनातून हाती घेतलेल्या या वृक्ष लागवड योजनेत पंढरपूर तालुक्यातील […]

Uncategorized

शहरी भागातील सर्वसामान्य जनतेकडे शासनाचे दुर्लक्ष 

मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि जवळपास पाच महिने संपूर्ण लॉककडाऊनचा अमल राज्यात सुरु होता.याच काळात पंढरपूर शहरातील सर्व व्यवसाय ठप्प होते,रोजच्या उत्पन्नावर उदर निर्वाह असलेले शहरातील गोरगरीब व मध्यमवर्गीय कुटूंबावर प्रचंड आर्थिक संकट कोसळले,पंढरपूर शहराचे अर्थकारण हे यात्रेवर अवलंबून असल्याने व वर्षातील चारही यात्रा भरल्या नाहीत त्यामुळे खूप मोठा फटका शहरातील नागिरकांना […]

Uncategorized

पंढरपुरातील संरक्षित झोपटपट्टी भागात प्रधानमंत्री आवास योजनाचा लाभ द्या 

नगर विकास राजमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार -दत्तात्रय भोसले    पंढरपूर शहरात राज्य शासनाने संरक्षीत झोपटपट्टी अधिनियमानुसार लागू केलेल्या आदेशाप्रमाणे पंढरपूर शहरात 7 प्रमुख संरक्षित झोपडपट्टी आहेत.या झोपडपट्यांच्या परिसरात जवळपास 6 हजार कुंटुंबे कच्च्या बांधकामाच्या अथवा चारही बाजुने पत्रा असलेल्या झोपडी वजा घरात वास्तव्य करतात.अनेक कुटुंबाकडे शोचालय आदी कुठल्याही सुविधा नाहीत.या पैकी काही कुटूंबे ही अनुसुचीत जाती […]

Uncategorized

रांझणी ते शिरगाव रस्त्याचे मंजुर काम एक वर्षांपासून प्रलंबित

रांझणी ते शिरगाव रस्त्याचे काम मंजुर एक वर्षांपासून प्रलंबित असून 6कि.मी.रस्त्याच्या मजबुतीकरण डांबरीकरण करण्याचे काम प्रधानमंञी ग्रामसडक कार्यालयामार्फत हाती घेण्यात आले होते या रस्त्यावर काही प्रमाणात खडीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी झालेनंतर त्यावर काहीच केले नसल्याने रस्त्याची खडी उचकटल्याने शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जाणे येणे कठीण झाले आहे उर्वरीत कामे पुर्ण करून डांबरीकरण करूण देणेसाठी मी स्वतः […]

Uncategorized

पंढरपुरातील लोकमान्य विद्यालयातील कारभाराची होणार उच्चस्तरीय चौकशी

राष्ट्रवादीच्या श्रीकांत शिंदे यांची होती मागणी पंढरपूर शहरातील लोकमान्य विद्यालयामध्ये अनेक चुकीच्या पध्दतीने शैक्षणिक पात्रता नसलेले केवळ राजकीय दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून तिथे अनेक शिक्षक व मुख्याध्यापक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर काही शिक्षिका या नगरसेवक यांच्या पत्नी असून त्यांनी घटस्फोटाचे करण दाखवून केवळ नोकरी मिळविण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक शिक्षक व मुख्याध्यापक यांची नेमणूक […]