वर्धा : महादेवाचे त्रिशूळ वर्ध्यातील वृद्धासाठी मृत्यूचा फास ठरले. त्रिशूळात मान अडकल्यामुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुच्या नशेत पूजा करताना हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
