Uncategorized

शहरी भागातील सर्वसामान्य जनतेकडे शासनाचे दुर्लक्ष 

मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि जवळपास पाच महिने संपूर्ण लॉककडाऊनचा अमल राज्यात सुरु होता.याच काळात पंढरपूर शहरातील सर्व व्यवसाय ठप्प होते,रोजच्या उत्पन्नावर उदर निर्वाह असलेले शहरातील गोरगरीब व मध्यमवर्गीय कुटूंबावर प्रचंड आर्थिक संकट कोसळले,पंढरपूर शहराचे अर्थकारण हे यात्रेवर अवलंबून असल्याने व वर्षातील चारही यात्रा भरल्या नाहीत त्यामुळे खूप मोठा फटका शहरातील नागिरकांना सहन करावा लागला.अशावेळी मायबाप सरकारकडून सामान्य लोकांना दिलासा देणारे निर्णय अपेक्षित होते.मात्र तसे होताना दिसून आले नाही.शहरातील नागिरकांचा नगर पालिका कर माफ करण्यात यावा,वीज बिलात सवलत मिळावी,वीज कनेक्शन कट करू नयेत अशा माफक अपेक्षा असताना व यासाठी वेळोवेळी निवेदने देऊन मागणी केली असतानाही निर्णय होत नाही,ना.अजित पवार यांनी वीज तोडणी तातडीने थांबवा असे आदेश देऊनही वीज कनेक्शन कट केले जात आहेत.हे पुढील दोन दिवसात न थांबल्यास प्रांत कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे यांनी दिला आहे.     

      या बाबत अधिक माहिती देताना संतोष कवडे म्हणाले कि,हे सरकार शहरी भागातील गोरगरीब जनतेकडे दुर्लक्ष करणारे आहे.पंढरपूर नगर पालिकेस मिळालेल्या ५ कोटी रुपये यात्रा अनुदानातून कर माफ करण्यात यावा अशी मागणी होती.या बाबत नगर पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे सांगते.मात्र शासन या बाबत भूमिका स्पष्ट करत नाही.व्यवसाय ठप्प असल्याने नगर पालिकेने लॉकडाऊनच्या काळातील गाळा भाडे माफ करावे अशीही रास्त मागणी आहे त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले.ऑक्टोबर २०२० मध्ये आलेल्या महापुराचा फटका शहरातील अनेक व्यवसायिकांना बसला,दुकाने पाण्याखाली गेली पण त्यांना शासनाकडून कुठलीही भरपाई दिली गेली नाही.एकूणच शासन शहरी भागातील सामान्य जनतेसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात हतबल ठरले आहे.   

त्यामुळेच येत्या दोन दिवसात वीज कनेक्शन तोडणे न थांबविल्यास व शहरातील नागिरकांचा म्युन्सिपल टॅक्स व गाळे भाडे व टॅक्स माफ न केल्यास १३ मार्च २०२१ रोजी सकाळी ठीक ११;३० वाजता आत्मदहन करणार असल्याचे निवदेन प्रांत कार्यलयात देण्यात आले आहे.                                                    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *