जागतिक महिला दिनानिमित्त देगाव येथे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. गावाचा विकास हा लोकसहभागातून व्हावा या उद्देशाने गावात सोलापूर सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यामध्ये नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन गावात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करत सदर वृक्षांचे उत्तमरीत्या संवर्धनही केले. त्यामुळे देगावला श्री.अभिजीत पाटील यांच्या हस्ते “ग्रामपंचायत हरित ग्राम सन्मान” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री.अभिजीत पाटील यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले तसेच महिला सक्षमीकरण व गावाच्या विकास कामात या पुढेही ठामपढे उभे राहण्याचे व मदतीसाठी आपण कायमच तयार आणि कटिबद्ध आहोत असे आश्वासन गावकऱ्यांना दिले.
त्याप्रसंगी देगावच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती राणीताई ढेकळे, उपसरपंच श्री.शरद डोईफोडे, तावशी गावचे श्री.बाळूकाका यादव, ग्रामसेविका श्रीमती राखीताई जाधव, डाॅ.श्री.पडवळे, डॉ.श्रीमती शिंदे मॅडम, श्री.भोसले सर, श्री.राकेश गायकवाड सर, श्री.गांडूळे सर, अंगणवाडी सेविका श्रीमती ढोले मॅडम, आशा वर्कर श्रीमती शेवंता पाटील मॅडम, श्रीमती मेटकरी ताई, श्रीमती मनिषा क्षीरसागर, श्रीमती राखी जाधव मॅडम, श्रीमती उषा पवार मॅडम, सोलापूर सोशल फाउंडेशनचे श्री.विजय कुचेकर व नागरिक उपस्थित होते.