Uncategorized

पंढरपुरातील संरक्षित झोपटपट्टी भागात प्रधानमंत्री आवास योजनाचा लाभ द्या 

नगर विकास राजमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार -दत्तात्रय भोसले   

पंढरपूर शहरात राज्य शासनाने संरक्षीत झोपटपट्टी अधिनियमानुसार लागू केलेल्या आदेशाप्रमाणे पंढरपूर शहरात 7 प्रमुख संरक्षित झोपडपट्टी आहेत.या झोपडपट्यांच्या परिसरात जवळपास 6 हजार कुंटुंबे कच्च्या बांधकामाच्या अथवा चारही बाजुने पत्रा असलेल्या झोपडी वजा घरात वास्तव्य करतात.अनेक कुटुंबाकडे शोचालय आदी कुठल्याही सुविधा नाहीत.या पैकी काही कुटूंबे ही अनुसुचीत जाती जमातीची आहेत त्यांपैकी काही कुटुंबांना रमाई घरकूल योजनेचा लाभ मिळाला आहे तर अनेक कुटूंब यापासुन देखील वंचीत आहेत.बुधवारी निवेदन देण्यात आले असून यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवी शिंदे,जिल्हा प्रमुख दत्तात्रय भोसले,संजय बंदपट्टे(कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पंढरपूर शहर)गौतम शिंदे(सहसचिव राष्ट्रवादी काँग्रेस)अनिल पवार,निखिल माने आदी उपस्थित होते.या बाबत कार्यवाही न झाल्यास संघटनेचे मार्गदर्शक नेते विजय चौगुले आणि भगिरथ भालके यांच्या माध्यमातून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी दत्तात्रय भोसले यांनी पंढरी वार्ताशी बोलताना सांगितले.     
मात्र याच वेळी एक गंभीर बाब आम्ही अधोरेखीत करीत आहोत.की पंढरपूर शहरातील या सातही प्रमुख संरक्षित झोपडपट्टी परिसरात वर्षानु वर्षे अगदी अनेक पिढयांपासून शेकडो कुटुंबे वास्तव्य करीत असून ते रहात असलेली झोपडी ही शासानाच्या नियमानुसार संरक्षित म्हणून संबोधली गेली आहे.आपल्यालाही पक्की घरे असावीत आणि यासाठी प्रधानमंत्री आवास योजनचा लाभ आहे त्या झोपडीच्या ठिकाणी घर बांधण्यासाठी मिळाला तर हे गरीब कुटूंबे बँक कर्ज अथवा अतिरिक्त कुठल्या कर्जाच्या अथवा खर्चाच्या खाईत लोटले जाणार नाहीत.
पंढरपूर शहरात सद्या नगर पालीकेच्या वतीने साकारण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री योजनेच्या 2092 घरांपैकी 892 घरांची पहीली सोडत काल निघाली.या घरांसाठी दहा हजार भरुन नोंदणी केलेल्या लोकांची नावे पाहता यात बहुतांश लोक हे झोपडपट्टीत राहणारे नाहीत तर अनेकांच्या कुटूंबाच्या नावे शहरात स्थावर मालमत्ता राहती घरे आहेत.मात्र बहुतांश झोपडी धारकांना प्रधानमंत्री योजनेच्या 2 लाख 67 हजार अनुदानाची रक्कम मिळेल पण उर्वरीत 5 लाख 40 हजार इतकरी रक्कम कर्ज म्हणून घेतली तर फेडणार कशी या चिंतेने नोदंणीच केलेली नाही.व घरांची किंमतही जास्त आहे अशी त्यांची तक्रार आहे.आणि म्हणूनच सध्या ज्या ठिकाणी हे झोपडपटटी धारक रहातात त्याच ठिकाणी पक्की घरे बांधण्यासाठी पंढरपूर नगर पालीकेने प्रस्ताव स्विकारुन या योजनेचा लाभ झोपडपट्टी धारकांना देण्यात यावा हे नम्र निवेदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *