राज्यात कोरोनाकाळात बालविवाहाचं प्रमाण वाढलं आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोग सक्रिय झाले आहे. यासाठी राज्य महिला आयोगानं एका नवीन नियम लागू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडं पत्र लिहून केली आहे. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नवीन नियम लागू करण्याची मागणी केली आहे. बाल विवाहाची सद्यस्थिती पाहता सदरचे या नवीन नियमानुसार महाराष्ट्रातील बालविवाह […]
Tag: #sarpanch
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची परंपरा आहे. शिवाजी महाराजांसारखे थोर महापुरुषाचा इतिहास या राज्याला आहे. अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, तसेच त्यांचे कार्यकर्ते शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्य करतात. पण शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेऊन चालणार नाही. त्यांचे विचार डोळ्यांसमोर ठेवून कृती करणं जास्त आवश्यकता आहे. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे पुण्यात एका […]
सरपंचाला 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
सांगली : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे (वय 39) याला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. करगणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मंगळवारी (15 जून) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सरंपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय? तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी करगणी येथून रस्ता काँक्रीट करण्याचे काम हाती […]
तुफान राडा, महिला ग्रामसेविका आणि सदस्यांमध्ये भर रस्त्यावर हाणामारी
भंडारा, 07 जून: भंडारा जिल्ह्यातील सिलेगाव येथे महिला ग्रामसेविका व महिला सदस्य यांच्यात तुफान हाणामारी पाहण्यास मिळाली. महिला सदस्यांनी महिला ग्रामसेविकेला मारहाण केली. घरकुल ठरावाच्या प्रोसिन्डिंग कॉपी मागण्यावरुन महिला सदस्यासह महिला सरपंच व ग्रामसेविका यांच्यात वाद झाला होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिलेगाव येथे […]
नियम पाळण्यासाठी सरपंच घालताहेत ग्रामस्थांना दंडवत
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने संचारबंदी लागू करीत निर्बंधही कडक केले आहेत. शहरासह गावातही कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. तरीही अनेक ग्रामस्थ बेफिकीरपणे वागत असल्याचे दिसत आहे. हे संकट टाळण्यासाठी त्यांचे प्रबोधन केले. दवंडी दिली तरीही ते ऐकत नाहीत. गावच्या पारावर गप्पा मारत बसतात. अशा ग्रामस्थांसमोर शेवटी कामरगावच्या सरपंचाने साष्टांग दंडवत घालणे सुरू केले आहे. त्यानंतर […]
चर्चा तर होणारच! शपथविधीसाठी सरपंचाची थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री
संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात हा सोहळा झाला. पुण्यात उद्योजक असलेले जालिंदर गागरे या गावाचे सरंपच झाले आहेत. त्यांनी दुपारी हेलिकॉप्टरने गावात प्रवेश केला. त्यानंतर बारा बैलांच्या गाडीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यास आख्खा गाव लोटला होता. नव्या सरपंचाचे आणि सदस्यांचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. या गावातील उद्योजक जालींदर गागरे यांच्या पुणे येथे अनेक […]
क्या बात! ‘या’ गावच्या ग्रामपंचायतीवर 55 वर्षे एकाच कुटुंबातील सरपंच
अहमदनगर : काही दिवसांपूर्वीच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि पाहतापाहता गावगाड्यात किमया करणाऱ्या अनेकांच्याच नावांची चर्चा झाली. यातच एक असं कुटुंबही प्रकाशझोतात आलं, ज्यानं ग्रामपंचायत निवडणूक गाजवण्याचा जणू विक्रमच केला. अहमदनगर येथील लोहसर गावात एकाच कुटुंबाने आपल्याच घरात 55 वर्ष ग्रामपंचायची सत्ता राखण्यात यश मिळावलं आहे. मागील 55 वर्षांपासून ग्रामपंचायतीची सत्ता येथील गीते कुटुंबाकडे […]
आता तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी होणार सरपंच सभा
ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या सभा घेऊन सरपंचांकडून गावांमधील जनतेचे प्रश्न, समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. […]