ताज्याघडामोडी

क्या बात! ‘या’ गावच्या ग्रामपंचायतीवर 55 वर्षे एकाच कुटुंबातील सरपंच

अहमदनगर : काही दिवसांपूर्वीच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि पाहतापाहता गावगाड्यात किमया करणाऱ्या अनेकांच्याच नावांची चर्चा झाली. यातच एक असं कुटुंबही प्रकाशझोतात आलं, ज्यानं ग्रामपंचायत निवडणूक गाजवण्याचा जणू विक्रमच केला.

अहमदनगर येथील लोहसर गावात एकाच कुटुंबाने आपल्याच घरात 55 वर्ष ग्रामपंचायची सत्ता राखण्यात यश मिळावलं आहे. मागील 55 वर्षांपासून ग्रामपंचायतीची सत्ता येथील गीते कुटुंबाकडे आहे. यंदाच्या वर्षी हिरा गीते सरपंच झाल्या असून, यापूर्वी त्यांचे पती अनिल गीते, सासरे जगन्नाथ गीते आणि अजेसासरे केशवराव गीते यांनी गावाचं सरपंचपद भुषवलं होतं.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेले लोहसर हे गाव. या गावाला आत्तापर्यंत संत तुकाराम, वनग्राम, गाडगेबाबा स्वच्छता अभियान, आदर्शगाव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. लोहसर गावात ग्रामपंचायतीच्या एकूण 9 जागा होत्या. अनिल गीते पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भैरवनाथ ग्रामविकास मंडळाने 9 पैकी 5 जागा जिंकून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली. यंदाच्या वर्षी हिरा गीते यांना सरपंच पद मिळाल्याने संपूर्ण गावाने आनंद उत्सव साजरा केला. आदर्श गाव म्हणूनही या लोहसरची ओळख आहे.माजी सरपंच असलेले अनिल गीते यांच्या पत्नी हिरा गीते यांची सरपंच पदी निवड करण्यात आली. हिरा अनिल गिते या लोहसरच्या सरपंचपदी दुसऱ्यांदा विराजमान झाल्या आहेत. गावकऱ्यांनी आमच्या कुटुंबावर टाकलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही असा विश्वास गीते दाम्पत्यानं व्यक्त केला. इतकंच नाही तर रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत गोष्टींसोबतच दारूबंदी करून गावाचा सर्वाधिक विकास करून गावचे नाव देशाच्या नकाशावर घेऊन जाऊ असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच हिरा गीते आणि माजी सरपंच अनिल गीते पाटील यांनी व्यक्त केला.अनिल गीते यांचे आजोबा केशवराव गीते पाटील यांनी सुरुवातीला 25 वर्ष गावात सरपंच म्हणून काम पाहिलं. त्यानंतर अनिल गीते यांचे वडील जगन्नाथ गीते हे 15 वर्ष सरपंच होते. आजोबा केशवराव गीते आणि वडील जगन्नाथ गीते यांनी सुरुवातीला गावाचा विकास करून गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर स्वतः अनिल गीते आणि पत्नी हिरा या दोघांनी 15 वर्षे सरपंचपद भूषवलं. या काळात गावातील समस्या दूर करून गावाला अनेक विकासकामांतून पुरस्कार मिळवून दिले. हिरा गीते यांनी सरपंच असताना महिलांच्या समस्या सोडवल्या. तसंच बचत गट, महिला सक्षमीकरण यातून गावातील महिलांना एकत्र करून रोजगार देखील उपलब्ध करून दिला. त्यामुळे लोहसर ग्रामस्थांनी पुन्हा गावाचा कारभार गीते कुटुंबियांना दिला.यंदाच्या वर्षी अनिल गीते यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भैरवनाथ ग्रामविकास मंडळाने ग्रामपंचायत निवडणुकीत 9 पैकी 5 जागा जिंकून पुन्हा ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच 55 वर्षे ग्रामपंचायत सरपंच होण्याचा बहुमान गीते कुटुंबीयांनी मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *