नाशिक, 27 एप्रिल: राज्यातील कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. अशावेळी कोरोनाचे संक्रमण वाढू नये याकरता विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या शहारांभोवती कोरोनाची विळखा अधिक आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन देखील लागू करण्यात आला आहे. या परिस्थितीत नाशिकमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची संख्या कमी […]
Tag: #patient
राज्यात गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आज ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. […]
पुन्हा एकदा नकोसा जागतिक विक्रम!
नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा उद्रेक रोज नव्या पातळीवर पोहचत असल्याचे दिसत आहे. रोज कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतानाच दिसत आहे. दरम्यान, मागील २४ तासात पुन्हा एकदा देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशात एका दिवसात सुमारे साडेतीन लाख नवीन रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. झाली आहे. ही आतापर्यंतची […]
मृत रुग्णाच्या बँक खात्यातून पैसे गायब; बोटाचे ठसे वापरुन वॉर्ड बॉयने केली चोरी
जालना, 23 एप्रिल: सध्या राज्यात कोरोना विषाणूची स्थिती हाताबाहेर जात आहे. उपचाराअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होतं आहे. तर रुग्णांचे कुटुंबीय आपल्या रुग्णाला वाचवण्यासाठी हवे तेवढे पैसे मोजायला तयार होतं आहेत. अर्थातच याचा आर्थिक फटका रुग्णाच्या कुटुंबीयांना सहन करावा लागत आहे. अशी एकंदरित स्थिती असताना जालन्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका […]
भारताचा एका दिवसात कोरोना रुग्ण वाढीचा जागतिक विक्रम
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत जगभरातील सर्वाधिक रुग्ण एकट्या भारतात आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णसंख्येने जगभरातील सर्व रेकॉर्ड ब्रेक करत आज ३ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ३ लाख १४ हजार ८३५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २०१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ […]
रुग्ण दगावल्याने नातेवाईकांंकडून डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड
पुण्यातील कोंढवा परिसरातील प्राईम हॉस्पिटलमध्ये आणलेला रुग्ण दगावल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड केली. मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी पंधरा ते वीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉक्टर सिद्धांत उदयकुमार तोतला (वय 25) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेबारा […]
धक्कादायक! कोरोना रुग्णावर मांत्रिकाकडून उपचार; महिलेचा मृत्यू
अमरावती, 17 एप्रिल: महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचा मेळघाट परिसर अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी अंद्धश्रद्धेला खातपाणी घालणाऱ्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली असून मेळघाटात कोरोनाबाधित रुग्णावर एक मांत्रिक उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनाबाधित महिलेवर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्यानं ही घटना […]