ताज्याघडामोडी

पंढरीत अट्टल दरोडेखोरासह मोटार सायकल चोरी करणारी चोरांची टोळी जेरबंद

पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं ३०७/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दिनांक २१/०५/२०२१ रोजी दाखल असून सदर गुन्हयाचे तपासकामी मा. श्री. विकम कदम सो., उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर व पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे तपास करीत असताना पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी तांजीक दृष्टया तपास करुन पंढरपूर शहरातील एका इसमाने सदर गुन्हा केल्याचा संशय आला.

सदर संशईत इसमाचा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे श्री. राजेंद्र मगदुम सहा. पोलीस निरीक्षक व त्यांचे पथक यांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यास सदर गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता त्याने पंढरपूर शहरातून व इतर ठिकाणाहून एकूण 0९ मोटार सायकल चोरल्या असल्याचे निष्पन्न झाले. नंतर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता चौकशी अंती सदर संशईत इसमाने वरील गुन्हयातील मोटार सायकल चोरुन नातेपूते, ता. माळशिरस येथील त्याचे मित्रास विकली असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर मित्रांस ही सदर गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेवून त्याच्याकडेही चौकशी केली असता सदर गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकल ही त्याचेकडे मिळून आली. तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यास पंढरपूर शहरातील रेकॉर्ड वरील आरोपीने त्यास आणखीन ७ मोटार सायकली पंढरपूर शहरातून व इतर ठिकाणाहून चोरी करुन त्याच्याकडे विकी करण्यास दिले असलेबाबत निषप्पन झाल्याने सदर गुन्हयातील संशईत इसम व त्याचा नातेपूते, ता. माळशिरस येथील मित्रास सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करुन त्यांच्या कडून एकूण १६ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

तसेच सदर गुन्हयातील आरोपीकडे पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं. ३७६/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील मोटार सायकल मिळाल्याने त्यास सदर गुन्हयात वर्ग करुन घेवून पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं. ३७६/२०२१ या गुन्हयात अटक करुन त्यास अधिक विश्‍वासात घेवुन तपास करता त्याचे कडून माहिती मिळाली की, मोरोची, ता. माळशिरस येथील एक इसमाकडे पंढरपूर शहर पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील आरोपीने पंढरपूर शहरातून व इतर ठिकाणाहून मोटार सायकली चोरी करुन त्याच्याकडे विकी करणे दिल्या आहेत.

सदर माहितीची खातरजमा करणेकरीता पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे पंढरपूर शहर पोलीस ठाणे रेकॉर्डवरील आरोपीचा नातेपूते, ता. माळशिरस येथे शोध घेत असताना तो मिळुन आला नाही.परंतु सदर रेकॉर्डवरील आरोपीचा पुतण्याकडे त्याची चौकशी केली असता त्याचे कडून ही माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी हा मोटार सायली चोरुन त्या मोटार सायकली मोरोची, ता.माळशिरस येथील आरोपीकडे मोटार सायकली विकी करीता देत असतो.लागलीच गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस अंमलदार मोरोची, ता. माळशिरस येथे जावून सदर इसमास शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेवून त्यास पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं. २९०/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करुन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता पंढरपूर शहर पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील आरोपीने सदर गुन्हयातील मोटार सायकल व इतर ठिकाणाहून इतर मोटार सायकली अशा १५ मोटार सायकल असल्याचे त्याने सांगितल्याने त्याचे कडून सदर गुन्हयाचे तपासकामी १५ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच सदर आरोपीस अधिक विश्‍वासात घेवुन त्याच्याकडे तपास करता पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील रेकॉर्ड वरील आरोपी हा घानंद, ता. आटपाडी, जि. सांगली याच्याकडेही मोटार सायकली विकण्या करीता देत असतो अशी माहिती मिळाली.

सदर माहितीची खातरजमा करणेकरीता पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे घानंद, ता. आटपाडी, जि. सांगली येथील इसमाचा शोध घेणेकामी जावून तो मिळून आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे प्राथमिक चौकशीत पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं. ३९१/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील मोटार सायकल असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करुन त्यास अधिक विश्‍वासात घेवून त्याच्याकडे सदर गुन्हयाचा तपास केला असता पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील रेकॉर्ड वरील आरोपीने सदर गुन्हयातील मोटार सायकल व इतर ठिकाणाहून १४ मोटार सायकली चोरुन त्याच्याकडे विकी करीता दिल्या असल्याचे त्याने सांगितल्याने त्याचे कडून सदर १५ मोटार सायकली सदर गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आल्या आहेत.

मोरोची,ता.माळशिरस येथील आरोपी बाबत अधिक माहिती घेतली असता त्याचे विरुध्द जबरी चोरी, दरोडा, बलत्कार, अग्नीशस्त्र जवळ बाळगणे अशा प्रमाणे खालील पोलीस ठाणेस गुन्हे दाखल आहेत.

१) फलटण पोलीस ठाणे २) नातेपूते पोलीस ठाणे ३) दहिवडी पोलीस ठाणे ४) माळशिरस पोलीस ठाणे ५) वालचंदनगर पोलीस ठाणे

वरील पोलीस ठाणेस त्याचे विरुध्द गुन्हे दाखल असून तो सध्या माळशिरस पोलीस ठाणे कडील दरोडयाच्या गुन्हयात फरार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील आरोपी सध्या अटक नसून लवकरच त्यास अटक करुन पंढरपूर शहर हददीतील आणि परिसरातील आणखीन गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू आहे.

वरील प्रमाणे गुन्हयात जप्त केलेल्या मोटार सायकली हया पंढरपूर शहरातून व सातारा, सांगली, कोल्हापूर, पूणे, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, उस्मानाबाद, लातूर जिल्यातील आहेत.

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक मा. तेजस्वी सातपुते मॅडम, अपर पोलीस अधिक्षक श्री.अतुल झेंडे सो, मा.श्री. विकम कदम सो., उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग,पंढरपूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र मगदुम, पोहेकॉ/४१९ शरद कदम, पोहेकॉ/१०६३ बिपीनचंद्र ढेरे, पोहेकॉ/ ३९६ सुरज हेंबाडे, पोहेकॉ/१३९५ राजेश गोसावी, पोहेकॉ/१८१ इरफान मुलाणी, पोना/१००५७ शोएब पठाण, पोना/१६३५ इरपान शेख, पोना/१७२२ महेश पवार, पोकॉ/२०२० संजय गुटाळ, पोकॉ/४८४ सुनिल बनसोडे पोकॉ/१२२८ सुजित जाधव, पोकॉ/२१९० समाधान माने, पोकॉ/४०७ विनोद पाटील, पोकॉ/ २२१६ अन्वर आतार (सायबर पोलीस ठाणेें तसेच पोलीस मुख्यालयाकडील पोना/२२१ प्रसाद औटी, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील पोहेकॉ/ ३५३ सुजित उबाळे यांनी केली असून सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस हवालदार सुरज हेंबाडे, बिपीनचंद्र ढेरे, पोलीस नाईक शोएब पठाण, महेश पवार हे करीत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *