ताज्याघडामोडी

भारतात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर बंद होणार?

नवी दिल्ली : भारतात सध्याच्या घडीला कार्यरत असणाऱ्या फेसबुक , ट्विटर आणि इंन्स्टाग्राम या समाजमाध्यमांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. किंबहुना येत्या 2 दिवसांमध्ये या माध्यमांवर बंदीही आणली जाण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातच केंद्र शासनानं या समाज माध्यमांच्या कंपन्यांना त्यांच्या धोरणांमध्ये बदल करत नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले होते. ज्यासाठी सरकारनं या कंपन्यांना तीन महिन्यांचा कालावधीही दिला होता. हा […]

ताज्याघडामोडी

व्हॉट््सअ‍ॅपला रोखण्याची केंद्राची न्यायालयात मागणी

व्हॉट््सअ‍ॅपचे नवे व्यक्तिगतता धोरण आणि सेवाशर्तींच्या अंमलबजावणीवर प्रतिबंध घालण्याची विनंती केंद्र सरकारने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयास केली. नव्या धोरणाची अंमलबजावणी १५ मेपासून केली जाणार आहे. व्हॉट््सअ‍ॅप या समाज माध्यम व्यासपीठाच्या व्यक्तिगतता धोरणाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती त्याबाबत माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही विनंती करण्यात आली आहे.

ताज्याघडामोडी

RBI ने घातली आणखी एका बँकेवर बंदी

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्नाटकमधील (Karnataka) डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर (Deccan Urban Cooperative Bank) निर्बंध घातले आहेत. या बँकेला आता व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यानंतर बँक यापुढे नवीन कर्ज देऊ शकत नाही किंवा ती कोणतीही ठेव स्वीकारू शकत नाही. या बँकेची आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे आरबीआयने हे निर्बंध जारी केले आहेत. […]