ताज्याघडामोडी

भारतात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर बंद होणार?

नवी दिल्ली : भारतात सध्याच्या घडीला कार्यरत असणाऱ्या फेसबुक , ट्विटर आणि इंन्स्टाग्राम या समाजमाध्यमांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. किंबहुना येत्या 2 दिवसांमध्ये या माध्यमांवर बंदीही आणली जाण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातच केंद्र शासनानं या समाज माध्यमांच्या कंपन्यांना त्यांच्या धोरणांमध्ये बदल करत नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले होते. ज्यासाठी सरकारनं या कंपन्यांना तीन महिन्यांचा कालावधीही दिला होता. हा कालावधी 26 मे रोजी संपणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आता या कंपन्यांनी अद्यापही या नियमांचं पालन न केल्यासया समाजमाध्यमांच्या सेवा बंद केल्या जाऊ शकतात.

केंद्र शासनाने 25 फेब्रुवारी 2021 ला भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं डिजिटल कंटेंटला रेग्युलेट करण्यासाठी तीन महिन्यांच्या आत कंम्प्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकारी नेमण्यास सांगितलं होतं. हे सर्वजण भारतातून काम करणं अपेक्षित होतं. परंतु अद्यापही या कंपन्यांनी हे आदेश पाळलेले नाहीत. ज्यामुळे या कंपन्यांच्या इंटरमीडियरी स्टेटला संपुष्टात आणलं जाऊ शकतं शिवाय त्यांच्यावर कारवाईही केली जाऊ शकते.

सध्याच्या घडीला, काही कंपन्यांनी या नियमांच्या अंमलबजावणीसाठी सहा महिन्यांचा कालावधी मागितल्याचं कळत असून, काहींनी अमेरिकेतील मुख्यालयाकडून येणाऱ्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं आता येत्या काही दिवसांत या समाज माध्यमांवर कारवाई केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *