जगाला धडकी भरवणाऱ्या करोनाचा अजूनही नायनाट करण्यात कोणत्याही देशाला यश आले नाही. त्यातच हा विषाणू रोज नवीन रूप धारण करत आणखी तीव्र होत असताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, याच करोनाच्या डेल्टा व्हेरियंटविषयी जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी पुन्हा एकदा डेल्टा व्हेरिंएटबाबत […]
Tag: #corona
महाराष्ट्रात निर्बंध शिथिल करण्यासंबंधी राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…..
करोना रुग्णसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाउन निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंबंधी अंतिम निर्णय घेणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी दोन दिवसांत लोकलसंबंधी निर्णय घेऊ शकतो असंही म्हटलं आहे. “११ […]
धक्कादायक! दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टर वर्षभरात तीनदा पॉझिटिव्ह
लस घेऊनही कोरोनाची लागण झाली, एकदा कोरोना होऊनही दुसऱ्यांदा कोरोना झाला असे प्रकार आपण आतापर्यंत ऐकले आहेत. मात्र मुंबईतील एका डॉक्टरला चक्क एक दोन वेळा नाही तर तीन वेळा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ते देखील फक्त वर्षभरात आणि लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही. डॉ. श्रुती हलारी असे त्या डॉक्टरचे नाव असून महानगर पालिकेने तिच्या […]
सप्टेंबरपासून 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या लसीकरणास सुरुवात ?
कोरोना महामारीच्या तिसर्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना व्हॅक्सीनबाबत एक दिलासादायक बातमी आहे. अखिल भारतीय वैद्यकीय संस्था , दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, झायडस कॅडिलाने ट्रायल पूर्ण केली आहे आणि त्यांना आता आपत्कालीन वापराची परवानगी मिळण्याची प्रतिक्षा आहे. सप्टेंबर महिन्यापासून 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे सुद्धा लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. जर […]
पंढरपूर नगर पालिकेकडून लसीकरणासाठीच्या नोंदणी प्रक्रियेत बदल
पंढरपुर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, यापूर्वी नगरपरिषदेने लसीकरणच्या 4000 नोंदणी केली होती त्यामधील 3800 लोकांची यादी प्रसिद्ध करून लस देण्यात आली आहे उर्वरीत 200 जण यांना लवकरच यादी प्रसिद्ध करून लस देण्यात येईल सध्या लसीकरण केंद्रावर होत असले गर्दी व नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी नगरपरिषदेने पुन्हा लसीकरण केंद्रावर नोंदणी करूनच लस देण्याचा निर्णय […]
लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
राज्यामध्ये कोरोनाचं प्रमाण दुसऱ्या लाटेत कमी होत असल्याचं चित्र असलं तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काळजी घेतली जात आहे. राज्यात कोरोनासंबंधी अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. हे निर्बंध हटण्यासंबंधी तसेच लसीकरण आणि राज्य सरकारची तयारी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात आपण […]
महाराष्ट्रात ऑक्सिजनविना एकही मृत्यू नाही,आरोग्यमंत्री टोपेंचा दावा
महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. राज्याकडे उपलब्ध असणारा साठा मर्यादित होता. रात्रीतून गाडी पोहोचली नाही, तर सकाळी ऑक्सिजन मिळणार नाही, अशी परिस्थिती राज्यात होती. मात्र ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. कोरोनाची दुसरी लाट कळस गाठत असताना राज्यात ऑक्सिजनचा […]
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या महिला डॉक्टरला अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटची लागण
आसाममधील एका महिला डॉक्टरला एकाच वेळी कोरोनाच्या डेल्टा आणि अल्फा या दोन्ही व्हॅरियंट्सची लागण झाल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या दिब्रुगड येथील प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रात केलेल्या चाचण्यांमधून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. एकाच वेळी दोन प्रकारच्या व्हॅरियंट्सची लागण होण्याची ही भारतातील पहिलीच ज्ञात घटना असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे […]
महाराष्ट्रावरचं मोठं संकट टळलं, राजेश टोपेंनी दिली दिलासादायक बातमी!
कोरोनाच्या लाटेतून महाराष्ट्र पुन्हा एकदा कुठे सावरत आहे. त्यातच मागील महिन्यात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटनं थैमान घातले होते. पण आता राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण आढळलेला नाही’ अशी दिलासादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यावर समोरील मोठे संकट तुर्तास टळले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा आदेश
मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (सोमवार) संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्सची स्थापन करावी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे असे निर्देश दिले. कोरोनाकाळात देखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये, या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोरोना काळात उत्पादन न थांबविता उद्योगांचे व्यवहार […]