ताज्याघडामोडी

पंढरपूर नगर पालिकेकडून लसीकरणासाठीच्या नोंदणी प्रक्रियेत बदल

पंढरपुर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, यापूर्वी नगरपरिषदेने लसीकरणच्या 4000 नोंदणी केली होती त्यामधील 3800 लोकांची यादी प्रसिद्ध करून लस देण्यात आली आहे उर्वरीत 200 जण यांना लवकरच यादी प्रसिद्ध करून लस देण्यात येईल सध्या लसीकरण केंद्रावर होत असले गर्दी व नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी नगरपरिषदेने पुन्हा लसीकरण केंद्रावर नोंदणी करूनच लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तरी सोमवार दि 26 जुलै 2021 पासून सकाळी 8:30 ते 11:30 या वेळेत पंढरपुर शहरातील वय वर्षे 40 पेक्षा जास्त असणाऱ्या ज्या नागरिकांनी प्रथम डोस घेतलेलाच नाही फक्त अशाच नागरिकांसाठीच कोविड 19 लसीकरण नांव नोंदणी खालील ठिकाणी करण्यात येत आहे (1)द ह कवठेकर प्रशाला तालुका पंढरपुर (2) विवेक वर्धिनी विद्यालय संतपेठ पंढरपुर व लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी ची नोंदणी 3). कवठेकर प्रशाला, नाथ चौक पंढरपुर (4) कर्मयोगी विद्या निकेतन, लिंक रोड, पंढरपुर या ठिकाणी राहील तरी वरील चार लसीकरण नोंदणी केंद्रावर जाऊन लसीकरणचा पहिला डोस व दुसरा डोस करणेसाठी आपले नांवाची नोंद करावी.

नांव नोंदणी करण्यास जाताना आपले स्वतःचे आधारकार्ड, मोबाईल नंबर घेऊन जावे मात्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार प्रत्यक्ष लस घेताना नागरिकांनी www.cowin.gov.in या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलेले असणे आवश्यक आहे ज्यांनी वरील वेब पोर्टल वर नोंदणी केली आहे त्यांनीच लसीकरण केंद्रावर नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणी केलेल्या नागरिकाचा ज्या दिवशी लसीकरणाचा नंबर येईल त्याच्या एक दिवस अगोदर नागरिकांच्या मोबाईल नंबर वर पंढरपुर नगरपरिषेदेमार्फत sms केला जाईल. त्या sms मध्ये नागरिकाचे नांव, कोविड 19 लसीकरणाचा दिनांक व वेळ व ठिकाण नमूद असेल.त्या नुसारच नागरिकांनी गर्दी न करता लसीचा पहिला डोस घेणेसाठी अरिहंत पब्लिक स्कूल, मनीषा नगर, पंढरपुर येथे व ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांनी पहिली लस घेतल्याचे सर्टिफिकेट घेऊन लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आदर्श प्राथमिक विद्यालय वेदांत भक्त निवास समोर भक्ती मार्ग पंढरपूर येथे उपस्थित राहावे मात्र लस घेण्यासाठी जाताना आपले टोकन आणि आधारकार्ड सोबत घेऊन जावे असे आवाहन पंढरपूर नगरपरिषद चे वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *