मुंबई, 26 जानेवारी : मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून कार्ड क्लोनिंगचे प्रकार वाढले आहे. सध्या मुंबईत ओटीपी, कार्डची माहिती तसंच बॅंक खात्यांची माहिती चोरुन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. आता नव नवीन पद्धत वापरुन कार्ड क्लोनिंग करून कार्डधारकांची फसवणूक होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. माहिम येथील जिमी हंसोटिया आणि मेहुल पटेल या दोन मुंबईकरांचे कार्ड क्लोनिंग […]
Tag: #MAHARASHTRA
कोरोना लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर आता कारवाई!
मुंबई : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचं उद्घाटन केलंय. दरम्यान देशात निर्मिती होत असलेल्या लसीबाबत अनेक अफवाही ऐकायला मिळत आहेत. त्याबाबत केंद्र सरकारनं आता कठोर पाऊल उचललं आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत एक […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आवारात पुण्यश्लोकअहिल्यादेवींच्या स्मारकासाठी निधीची तरतूद करण्यासाठी व अध्यासन केंद्रासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यासाठी या प्रमुख मागण्यासाठी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांचे बेमुदत उपोषण सुरू. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी निधी देणार असल्याची घोषणा केली होती.परंतू घोषणेच्या पुढे सरकार जात नाही.त्यामुळे या स्मारकासाठी तात्काळ निधी […]
ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत- ना.विजय वडेट्टीवार
“एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात बारा बलुतेदारांच्या जाती असताना ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत. बहुजन कल्याण विभाग मंत्री म्हणून ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेली आहे. आवश्यकता पडल्यास स्वतंत्र जनगणनेचा प्रस्ताव मी विधानसभेत मांडेल. जेथे संधी मिळेल तेथे ओबीसी समाजाचा आवाज उचलून धरणार. पक्ष, जात विसरून फक्त […]
खोट्या तक्रारी करणाऱ्या महिलांवर होणार कारवाई
महिलांवरील अत्याचाराच्या घटना बघता शक्ती कायदा लवकरच लागू करण्यात येणार आहे. मात्र महिलादेखील दहा ते वीस वर्षानंतर हेतूपरस्पर अत्याचाराच्या तक्रारी करतात. यातील बहुसंख्य तक्रारी या खोट्या असतात. अशा महिलांवर बंधन ठेवण्यासाठी, वेळप्रसंगी कारवाईची तरतूद शक्ती कायद्यात असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चंद्रपुरातील बल्लारपूरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गृहमंत्री देशमुख […]
गुन्हा केला तर भरावा लागेल 50 लाखांपर्यंत दंड!
मुंबई, 22 जानेवारी : गुन्हेगारांना चाप बसावा याकरता पोलिसांकडून अनेक युक्त्या लढवल्या जातात. मुंबई पोलिसांनी तर एक पाऊस पुढे टाकत गुन्हेगारांना आळा बसावा याकरता गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांकडून चांगला वर्तन व्हावे म्हणून बॉण्ड भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि जर या बाॅण्डचे उल्लंघन केले तर 15 ते 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड या गुन्हेगारांना भरावा […]
तर तुमचा वीजपुरवठा खंडित होणार
मुंबई, 19 जानेवारी : लॉकडाऊन काळात वीज सवलत देण्याची भाषा करणाऱ्या उर्जा मंत्रालयाने आता ग्राहकांना इशारा देत वीजबिल वसुलीची मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. थकबाकी वसूल करण्याचे आणि थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास आज दिले आहेत. ‘डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे […]
पोलिसांचा गणवेश बदलण्याच्या मागणीचा विचार करू -गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : पोलीसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा आहे. त्यामुळे गणवेशात बदल करावेत अशी मागणी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करू. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी करू असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. राज्यातील पोलिसांचा गणवेश बदलणार असल्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. पोलिसांच्या गणवेशात बदल झाल्यानंतर गणवेशात […]
आरोग्य विभागात लवकरचं 17 हजार पदांची नव्याने भरती – ना.राजेश टोपे
कोरोना काळात राज्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवर ताण येत होता. आरोग्य यंत्रेणेवरील ताण कमी करण्यासाठी आरोग्य विभागात लवकरचं 17 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतला आहे. कळंब येथील एका खासगी रुग्णालयाच्या उदघाटन प्रसंगी राजेश टोपे बोलत होते. डॉक्टर, नर्सेस, टेकनेशीयन, वॉर्ड बॉय, अशा […]
बर्ड फ्लूमुळे व्यक्ती दगावल्याचे सिद्ध केल्यास पारितोषिक देतो !
बर्ड फ्लूमुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यु होत नाही. समाज माध्यमांवर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. जर कोणी व्यक्ती बर्ड फ्लूमुळे दगावल्याचे दाखविल्यास त्यांना पारितोषिक दिले जाईल, असे आवाहन पशुसंर्वधन, दुग्धविकास व मत्सविकास मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले. शेतकरी भवन येथे विदर्भ पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ पोल्ट्री फार्मर्स […]