ताज्याघडामोडी

बर्ड फ्लूमुळे व्यक्ती दगावल्याचे सिद्ध केल्यास पारितोषिक देतो !

बर्ड फ्लूमुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यु होत नाही. समाज माध्यमांवर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. जर कोणी व्यक्ती बर्ड फ्लूमुळे दगावल्याचे दाखविल्यास त्यांना पारितोषिक दिले जाईल, असे आवाहन पशुसंर्वधन, दुग्धविकास व मत्सविकास मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.

शेतकरी भवन येथे विदर्भ पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजा दुधबडे, सचिव डॉ. गजानन वानखेडे, सहसचिव हुसेन शेख, उपाध्यक्ष डॉ. सुरेंद्र राऊत तसेच शेतकरी प्रतिनिधी डॉ. पिंकी इंगेवार, प्रेमचंद्र पाटील यावेळी उपस्थित होते.

बर्ड फ्लू विषाणूची बाधा मानवाला होत नाही. यासाठी चिकन तसेच अंडी सेवन करतांना भीती बाळगू नका. कुक्कुटपालन व्यवसाय हा ग्रामिण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा जोडधंदा आहे. चिकन तसेच अंडी यामध्ये कोणतीही भेसळ राहत नाही. शिवाय यामध्ये मोठया प्रमाणात प्रथिने असतात. जर कोणी व्यक्ती बर्ड फ्लूमुळे दगावल्याचे दाखवविल्यास त्याला रोख बक्षिस देण्यात येइल. यासाठी नागरिकांनी न घाबरता चिकन अंडी सेवन करावे. पुढील आठवड्यात शहरात चिकन-अंडी महोत्सव राबविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *