मुंबई, 26 जानेवारी : मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून कार्ड क्लोनिंगचे प्रकार वाढले आहे. सध्या मुंबईत ओटीपी, कार्डची माहिती तसंच बॅंक खात्यांची माहिती चोरुन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. आता नव नवीन पद्धत वापरुन कार्ड क्लोनिंग करून कार्डधारकांची फसवणूक होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे.
माहिम येथील जिमी हंसोटिया आणि मेहुल पटेल या दोन मुंबईकरांचे कार्ड क्लोनिंग करुन जिमी हंसोटिया यांना 50 हजार तर मेहूल पटेल यांना कार्ड क्लोलिंग करून चोरांनी 95 हजार रुपये लंपास केले आहे. तर मुंबईतील गावदेवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका महिला वकिलाच्या खात्यातून 65 हजार रुपये, अंधेरी येथील एका व्यावसायिकाच्या खात्यातून 20 हजार रुपये, बोरीवली येथील जय मेहता यांच्या खात्यातून 40 हजार रुपये, आणि ताडगेव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 65 वर्षीय वृद्धाच्या खात्यातून 58 हजार रुपये चोरले गेले आहेत. या सर्वांनी एटीएमचा वापर केला होता. मात्र, त्यावेळेस यांनी कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. खरंतर प्रत्येक वेळेस एटीएममधून पैसे वाढताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे अन्यथा तुमची फसवणूक झालीच म्हणून समजा.