ताज्याघडामोडी

कोरोना लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर आता कारवाई!

मुंबई : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचं उद्घाटन केलंय. दरम्यान देशात निर्मिती होत असलेल्या लसीबाबत अनेक अफवाही ऐकायला मिळत आहेत. त्याबाबत केंद्र सरकारनं आता कठोर पाऊल उचललं आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत एक पत्र लिहिलं आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कोरोना लसीसंदर्भात अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कारदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

कोरोना लसीबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि खोट्या बातम्या रोखण्यासाठी अशा लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे. तसंच वास्तविक तथ्यांवर आधारीत आणि विश्वसनीय सूचनांचा प्रसार करण्याचा सल्लाही केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी दिला आहे. त्यामुळे आता कोरोना लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीररित्या दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *