मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव ते तपकिरी शेटफळ ते मेथवडे या रस्त्याचे काम सुरू असून हे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे मात्र तपकिरी शेटफळ हद्दीतील 400 मीटर रस्त्याचे काम अपुरे असून हे काम पूर्ण करण्यास तपकिरी शेटफळ येथील ग्रामस्थ युवराज बापू कांबळे बापू कांबळे उज्वला युवराज कांबळे लता बापू कांबळे […]
पंढरी वार्ता न्युज पोर्टल
पंढरपूर शहरासह उपनगरातील छोट्या व्यावसायिकांचे नुकसान करणाऱ्या मुख्याधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करण्याची भाजपाची मागणी
पंढरपूर – पंढरपूर शहरातील नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर साहेब यांनी पंढरपूर शहर व उपनगरातील अनेक छोट्या व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची पुर्वसूचना न देता अचानकपणे जेसीबीच्या सहाय्याने अनेकांच्या व्यावसायाचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले असून त्यामुळे त्यांच्या कारवाईबद्दल अनेकांतून नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे. मुख्याधिकारी मानोरकर यांनी केवळ उसने आवसान आणून हातावरचे पोट असणाऱ्यांना उघड्यावर आणलेले आहे. आपलं […]
पंढरपूर शहर तालुक्यातील ८ हजार ४८९ कोरोना रुग्णांपैकी केवळ ५७५ रुग्णांना मिळाला महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ
मार्च २०२० मध्ये राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली होती.९ मार्च रोजी पहिला रुग्ण पुणे येथे सापडल्यानंतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले खरे पण रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत चालली आणि सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी कोरोनावरील सर्व रुग्णांवर राज्यात महात्मा फुले […]
प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, एम.टेक.,फार्मसी व एम.बी.ए.च्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ
पंढरपूरः ‘प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी), एम.टेक., फार्मसी (पदवी व थेट द्वितीय वर्ष) व एम.बी.ए (पदव्युत्तर पदवी) च्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेला (कॅप) मुदतवाढ देण्यात आली असून आता प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी.इ.अथवा बी. टेक.) ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप रजिस्ट्रेशन) साठी मंगळवार दि.२२ डिसेंबर २०२० पर्यंत, थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, फार्मसी व थेट द्वितीय […]
इंजिनिअरींग प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेशासाठी मुदत ऑनलाईन प्रवेशासाठी कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज शेळवे येथे SC6326 – Scrutiny Center शी संपर्क साधावा – प्राचार्य, डॉ.एस.पी.पाटील
इंजिनिअरींग प्रवेशासाठी अर्ज करणेसाठी बुधवार, दि.०९.१२.२०२० पासून सुरुवात झाली, परंतु बरेच विद्यार्थी कागदपत्रे काढणे असे की, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र याच प्रक्रियेत आहेत व त्यामुळे आज थेट व्दितीय वर्ष अर्ज करणेची मुदत संपत असतानाच ‘महाराष्ट् सीईटी सेल’ ने अर्ज करणेची मुदत वाढवून विद्यार्थ्यांना मोठाच दिलासा दिला […]
‘हिंदकेसरी’ वस्ताद श्रीपती खंचनाळे यांच्या निधनानं कुस्ती चळवळीचा मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 14 :- महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्व, हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पहेलवान, वस्ताद श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून राज्याच्या कुस्ती चळवळीचा आधारस्तंभ, उदयोन्मुख कुस्तीपटूंचे मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित […]
शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून शासनाच्या जीआरची करण्यात आली होळी
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/ पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय हा पूर्णतः अन्यायकारक असून शासनानेच नेमलेल्या आकृतिबंध समितीने सुचवलेल्या सूचनांच्या पूर्णपणे विरोधात हा शासन निर्णय आहे. त्यामुळेच शासनाच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जाहीर निषेध करत आहेत. राज्य […]
स्वेरीत ‘टेक्नोसोसायटल– २०२०’ ही तिसरी आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषद संपन्न ‘तंत्रज्ञानाचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा’ ‘टेक्नोसोसायटल– २०२०’ मधून उमटला सूर
पंढरपूर: स्वेरीमध्ये आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय ‘टेक्नोसोसायटल– २०२०’ ही तिसरी आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषद आज संपन्न झाली. या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एआयसीटीईचे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुद्दे यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केले तर या तिसऱ्या आंतराष्ट्रीय परिषदेचे प्लेनरी स्पीकर म्हणून ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ (भारतातील पद्मविभूषण दर्जाचा पुरस्कार) […]
सहकार शिरोमणी कारखान्याच्या आसवणीचे उत्पादन सुरु
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-21च्या डिस्टीलरी प्रकल्पाचे उत्पादनाचा शुभारंभ मुंबई येथील युनिव्हर्सल एम्पोर्ट अॅण्ड एक्स्पोर्ट हॉस्पॕलिटी कंपनीचे एक्सपोर्ट मॕनेजर राखी लालजानी यांचे व पुणे येथील ग्लोबल एक्झीम अॅण्ड डोमेस्टीक कार्पोरशनच्या प्रोप्रायटर आरती डोंगरे यांचे शुभहस्ते फरमंटेशन टँकमध्ये कल्चर टाकून करण्यात आला. प्रथम मा.पाहुण्यांचे शुभहस्ते संस्थापक कै.वसंतदादा […]
पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात पंढरपुरात पेट्रोल पंपासमोर शिवसेनेचे बोंबाबोंब आंदोलन
गेल्या महिनाभरापासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे सातत्याने वाढत चालले असून पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे.तर काही ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल एकाच दराने मिळत आहे.इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वत्र महागाईचा भडका उडणार असून कोरोनामुळे आधीच सर्वसामान्य जनतेचे जगणे मुशिक्ल असताना मोदी सरकार सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे.अशी भावना व्यक्त करीत […]