ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

इंजिनिअरींग प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेशासाठी मुदत ऑनलाईन प्रवेशासाठी कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज शेळवे येथे SC6326 – Scrutiny Center शी संपर्क साधावा – प्राचार्य, डॉ.एस.पी.पाटील

 

       इंजिनिअरींग प्रवेशासाठी अर्ज करणेसाठी बुधवार, दि.०९.१२.२०२० पासून सुरुवात झाली, परंतु बरेच विद्यार्थी कागदपत्रे काढणे असे की, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र याच प्रक्रियेत आहेत व त्यामुळे आज थेट व्दितीय वर्ष अर्ज करणेची मुदत संपत असतानाच ‘महाराष्ट् सीईटी सेल’ ने अर्ज करणेची मुदत वाढवून विद्यार्थ्यांना मोठाच दिलासा दिला आहे.

       कोव्हीड-१९ च्या भितीमुळे ब-याच विद्यार्थ्यांनी कागदपत्रे काढली नसावीत त्यामुळे विद्यार्थी आता कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष इंजिनअरींगसाठी अर्ज करणेची मुदत अनुक्रमे दि.२१.१२.२०२० व २२.१२.२०२० अशी वाढविण्यात आल्याची माहिती कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज, शेळवे-पंढरपूरचे प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदत वाढीचा जास्तीत जास्त लाभ घेवून आपला इंजिनिअरींगचा मार्ग सुकर करावा. ज्या विद्यार्थ्यांना Online Registration करणेसाठी काही शंका असल्यास विद्यार्थ्यांनी कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज शेळवे, येथील SC6326 (Scrutiny Center) ला संपर्क साधावा असे आवाहन डॉ.एस.पी.पाटील यांनी केले आहे.
Scrutiny Center संपर्क –१) प्रा.सावेकर एस.जे.- ९८६००३५१३८
२) प्रा.देशमाने ए. ए. – ९५५२२३५८५४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *