ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

पंढरपूर शहर तालुक्यातील ८ हजार ४८९ कोरोना रुग्णांपैकी केवळ ५७५ रुग्णांना मिळाला महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ

          मार्च २०२० मध्ये राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली होती.९ मार्च रोजी पहिला रुग्ण पुणे येथे सापडल्यानंतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले खरे पण रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत चालली आणि सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी कोरोनावरील सर्व रुग्णांवर राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत शासनखर्चाने उपचार केले जातील अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. 
       सोलापूर शहरात १३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ लागला. पंढरपूर शहर तालुक्यातही याच काळात कोरोनाने शिरकाव केला.कोरोना रुग्णाची शहर तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरातील काही रुग्णालये डेडीकेटेड कोविड रुग्णालये म्हणून अधिग्रहित करण्यात आली या ठिकाणी कोरोना रुग्णावर महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत कोरोना बाधितांवर उपचार होतील तर प्रमुख हॉस्पिटल मधील राखीव ठेवण्यात आलेल्या जागांवरील २० टक्के रुग्णावरही याच योजने अंतर्गत उपचार होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र या योजनेचा लाभ पंढरपूर शहर व तालुक्यातील केवळ ५७५ कोरोना बाधितांना मिळाला असल्याचे प्राप्त आकडेवारी नुसार दिसून येत आहे.
          मार्च २०२० ते ६ डिसेंबर २०२० या कालावधीत पंढरपूर शहरातील गणपती हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत सर्वाधिक १४९ रुगांवर उपचार करण्यात आले असून या पोटी या हॉस्पिटलला ३२ लाख ६६ हजार इतका निधी खर्चापोटी प्रस्तावित करण्यात आला आहे तर पंढरपुरातील लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये या काळात या योजनेअंतर्गत १३९ रुग्णांना लाभ मिळाला असून या पोटी या हॉस्पिटलला ४० लाख इतका निधी खर्चापोटी प्रस्तावित करण्यात आला आहे.तर जनकल्यान हॉस्पिटल येथे या योजनेअंतर्गत १२८ रुग्णावर उपचार करण्यात आले असून या हॉस्पटिलला ३३ लाख २४ हजार इतका निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.तर उपजिल्हा रुग्णालयात या योजनेत ६६ रुग्णावर उपचार करण्यात आले व यासाठी ६६ लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.
             एकूणच उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल झालेल्या सर्वच कोरोना बाधितांना या योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित असताना शहर तालुकयातील केवळ  ५७५ रुग्णांना याचा लाभ मिळाला असून प्रस्तावित निधीच्या प्रस्तवानुसार लाईफलाईन हॉस्पटिल सर्वात मोठे तुलनेने कमी रुग्णावर योनेअंतर्गत उपचार करून सर्वाधिक निधीचा लाभार्थी ठरणार आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *