गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गावगुंडाचा त्रास; स्टेटस ठेवत पती-पत्नीनं घेतला गळफास! पतीचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज

गावातील गावगुंडांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पती पत्नीनं गळफास घेतला. यात पतीचा मृत्यू झाला तर दोरी तुटल्यानं पत्नी बचावली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पतीनं ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटलं आहे की, गावातील 5 गावगुंडांकडून सतत मला आणि पत्नीला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल केलं जातं […]

ताज्याघडामोडी

पोलिसांच्या ताब्यात असतानाही सदावर्ते ऐकना! सातारा पोलीस ठाण्याबाहेर ‘भारत माता की जय’ घोषणा

सातारा, 14 एप्रिल : भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबईच्या गिरगाव कोर्टाने त्यांना याप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी […]

ताज्याघडामोडी

एटीएम मधून पैसे काढताना शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू

पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम मशीनचा वापर करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये बुधवारी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एटीएम मशीनमधून पैसे काढत असताना विजेचा हाय व्होल्टेज धक्का लागून एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृत्यूनंतर लोकांनी गोंधळ घातला आणि संताप व्यक्त केला. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिकाऱ्यांकडून घोरपडीवर बलात्कार; पोलिसांकडून आरोपींना अटक

कोल्हापुरात गोठणेजवळ असणाऱ्या सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात चक्क एका घोरपडीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. विनापरवाना शस्त्रासह व्याघ्रप्रकल्पात घुसल्यानंतर अटकेची कारवाई केली असता हा प्रकार समोर आला. आरोपींचे मोबाइल तपासण्यात आले असता हे विकृत कृत्य उघडकीस आलं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातातील चांदोली वनपरीक्षेत्रातील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

१७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर आरोपी अल्पवयीन असल्याचं सिद्ध; सुप्रीम कोर्टाकडून सुटका

हत्या प्रकरणात १७ वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर गुन्हेगार अल्पवयीन असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्याची सुटका करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात आरोपीवर खुनाचा गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर दोषी व्यक्तीनं अर्ज दाखल करत घटनेच्या वेळी आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला. त्यामुळे त्याची सुटका करण्यात आली. घटना उत्तर प्रदेशातील आहे. […]

ताज्याघडामोडी

कीर्तनासाठी जाताना इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात

सुप्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथे रात्री 10 च्या सुमारास इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरला किरकोळ मार लागला आहे. काल इंदोरीकर महाराज जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चॉकलेटच्या आमिषाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, 60 वर्षांच्या नराधमाला बेड्या

चॉकलेटचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. नांदेड जिल्ह्यात हा प्रकार समोर आला आहे. 60 वर्षांच्या नराधमाने चिमुरडीवर अत्याचार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. लोह्याजवळ काल ही घटना घडली. नरबा कांबळे असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. पीडितेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गावकऱ्यांनी या नराधमास चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या […]

ताज्याघडामोडी

प्रकाश आंबेडकरांनी केली विश्वास नांगरे पाटलांना निलंबित करण्याची मागणी

मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील (कायदा व सुव्यवस्था ) यांना निलंबित करण्याची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मागणी केली आहे. आंबेडकर यांनी ही मागणी आज अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी पत्रकारांशी बोलताना केली आहे. गुप्तचर यंत्रणांनी सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था ) […]

ताज्याघडामोडी

४ दिवस नॉट रिचेबल, जामीन मिळताच सोमय्या मुंबईत दाखल

आयएनएस विक्रांत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज अटकपूर्व जामीन मिळाला. गेल्या चार दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले सोमय्या जामीन मिळताच मुंबईत दाखल झाले. विमानतळावरुनच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत न्यायालयाचे आभार मानले. तसंच कुठलाही गुन्हा केलेला नसताना खोटे आरोप करुन तुम्ही माझं तोंड बंद करु शकत नाही. मी उद्धव ठाकरे […]

ताज्याघडामोडी

समान नागरी कायदा आणा, राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे थेट मागणी

पंतप्रधान नरेंद मोदी यांना एकच मागणी करतो, देशात समान नागरी कायदा आणा आणि देशातील लोक संख्या कमी करण्यासाठी कायदा आणा, अशी मागणीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केली. ‘आम्हाला तुमच्याकडे 5 जण आहे, त्यांचं काही वाटत नाही. पण या देशामध्ये काही गोष्टी होणे गरजेचं आहे. मला ज्या गोष्टींबद्दल विरोध करायचा होता, केला. उद्या […]