गावातील गावगुंडांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पती पत्नीनं गळफास घेतला. यात पतीचा मृत्यू झाला तर दोरी तुटल्यानं पत्नी बचावली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.
पतीनं ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटलं आहे की, गावातील 5 गावगुंडांकडून सतत मला आणि पत्नीला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल केलं जातं असल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून पती पत्नीने गळफास घेतला.
यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे. ही धक्कादायक घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यात घडली आहे.