ताज्याघडामोडी

समान नागरी कायदा आणा, राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे थेट मागणी

पंतप्रधान नरेंद मोदी यांना एकच मागणी करतो, देशात समान नागरी कायदा आणा आणि देशातील लोक संख्या कमी करण्यासाठी कायदा आणा, अशी मागणीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केली. ‘आम्हाला तुमच्याकडे 5 जण आहे, त्यांचं काही वाटत नाही. पण या देशामध्ये काही गोष्टी होणे गरजेचं आहे. मला ज्या गोष्टींबद्दल विरोध करायचा होता, केला. उद्या परत विरोध करणार आहे’ असंह ठाकरे म्हणाले.

ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तरसभा सुरू आहे. या सभेत राज ठाकरेंनी यांनी पुन्हा एकदा विरोधकांना जोरदार हल्लाबोल केला आहे.

गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे या विषयांवर बोलतील, असं पत्रकार आणि संपादकांना वाटलं. मोदींवर बोलतील असं वाटलं होतं. पण परत वेळ आली तर मोदींवर बोलले. इतरही विषय आहे. मागील निवडणुकामध्ये बहुमत भाजपाकडे आलं त्यानंतर मतदारांशी प्रतारणा केली. त्यानंतर पहाटे शपथविधी झाला. त्यानंतर यांचे सरकार आहे, मग मी काय चुकीचं बोललो, असा सवालच ठाकरेंनी यांनी केला.

ईडीची नोटीस आली म्हणून मी बदललो. पण मी ट्रॅक नाही बदलला, मला ट्रॅक बदलायला नाही लागत. माहिती करून काही घ्यायची नाही उगाच काहीही आरोप करायचे. कोहिनूर मिलमध्ये माझं नाव आलं होतं. त्या भानगडीतून मी बाहेर पडलो. नंतर ईडीच्या कार्यालयात गेलो होतो. शरद पवार यांनाही नोटीस येणार याची चाहूल लागली होती. त्यानंतर किती नाटक केलं. मराठी माणसाने व्यवसायही करायचा नाही का, असं राज ठाकरे म्हणाले.

एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी ईडीची कारवाई झाली. मग तुमच्या घरी का होता. शरद पवार लगेच पंतप्रधान मोदींची भेट घेतात. अनिल देशमुख यांचा मार्ग मोकळा केला. नवाब मलिक जास्त बोलताय, मग हे मोदींना भेटले. त्यानंतर पुन्हा मोदींना भेटले आणि मलिक मध्ये गेले.

आता संजय राऊत यांच्याबद्दल पवार मोदींना भेटले. पवार एकदा खूश झाले होते. ते खूश झाल्यावर काय घडले सांगता येत नाही. संजय राऊत यांना कधी टांगतील हे सांगता येत नाही, असा टोलाही राज यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *