नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका निवृत्त पोलीसाने आपल्या भावासोबत मिळून जन्मदात्या आईला तब्बल दहा वर्ष घरात कोंडून ठेवले होते. दहा वर्षांनी दोघांविरूद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. चेन्नईमध्ये एका 72 वर्षाच्या महिलेला तिच्या दोन मुलांनी गेली दहा वर्षे घरात कोंडून ठेवले आहे. निवृत्त पोलीस षण्मुघसुंदरमने आपला […]
ताज्याघडामोडी
राज ठाकरेंना लोक फार ओळखून आहेत, त्यामुळे…
सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाय, राज ठाकरेंच्या सभांमधील भाषणांवरून पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा पेटताना दिसत आहे. राजकीय नेते मंडळींच्या विविध प्रतिक्रिया यावरून उमटत आहेत. जोरदार टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली […]
गुणरत्न सदावर्तेंची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस जाहीर, तर…
कामगारांमध्ये हस्तक्षेप करून एसटी कर्मचार्यांच्या भावना भडकावून, भाषणे करून, आक्षेपार्ह वक्तव्य करून संकट निर्माण करत शरद पवारांच्या बारामतीत 12 तारखेला येऊन बारा वाजता मोर्चा काढून हल्ला करीन असे म्हणत पवारांच्या अस्मितेला धक्का देण्याचे काम गुणरत्न सदावर्ते यांनी केले होते. त्या सदावर्तेची आम्ही बारामतीत वाट पाहत असून भविष्यात सदावर्तेच काय पण त्या मनोवृत्तीचे लोक बारामतीत पाऊल […]
कोल्हापुरातील निकालाबाबत चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
महाविकास आघाडी सरकारने बाजी मारली आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. तर, भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभव झाला आहे. याप्रकरणी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. “भाजपने एकट्याने ७७ हजार मतं मिळवली” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसेच “ही लढत तीन पक्ष विरुद्ध एक […]
शरद पवारांचं भाषण सुरू असताना एकाच व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न, पोलिसांनी घेतले ताब्यात
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना ताजी असताना आज जालन्यात (jalana) आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. शरद पवार भाषणाला उभे राहिले असता अचानक एका व्यक्तीने व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केला. पण, वेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिदिनी ६० हजार लिटर्स इथेनॉल […]
रामनवमी हिंसाचाराचा कट विदेशात रचला!; धक्कादायक माहिती उघड
गुजरातमधील खंभात येथे रामनवमी दिवशी हिंसाचार उसळला होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासातून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. जातीय सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने विदेशात कट रचून हा हिंसाचार घडवून आणण्यात आला असल्याचे पुरावेच पोलिसांच्या हाती लागले आहेत. आणंद जिल्हा पोलीस अधीक्षक अजित राजिया यांनी या हिंसाचाराच्या तपासाबाबत महत्त्वाचा तपशील दिला आहे. हिंसाचार घडवण्यासाठी खंभात येथे बाहेरून माणसं […]
निर्दयी माता! पतीचा मृत्यू होताच सहा मुलांना सोडून प्रियकराबरोबर गेली पळून…
आई पळून गेल्याने अनाथ झालेल्या सर्व मुलांनी इतर नातेवाईकांसह शमशाबाद पोलीस ठाणे गाठले. तेथे त्यांनी शेजारच्या एका तरुणासह त्याची आई पळून गेल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. शमशाबादमधील बडेर गावात राहणारी राणी अहिरवार (30) असे या महिलेचे नाव आहे. ती 6 निष्पाप मुलांना आजारी व रडण्याच्या अवस्थेत सोडून शेजाऱ्यासोबत पळून गेली. या निरागस मुलांना आता कोणताच […]
झाडू विकणाऱ्या महिलेचा प्रामाणिकपणा, दोन लाखांचं ब्रेसलेट केलं परत
कल्याणमधील एका झाडू विकणाऱ्या महिलेच्या कृतीमुळे समाजात आजही माणुसकी आणि प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचा प्रत्यय आला आहे. या महिलेने तब्बल दोन लाख रूपये किंमत असलेलं सोन्याचं ब्रेसलेट प्रामाणिकपणे परत केले आहे. जाहिदा शेख (वय, 60) असे या महिलेचे नाव आहे. कल्याणच्या सहाय्यक आयुक्त पोलीस कार्यालयाजवळ नाराळाच्या झावळ्या आणि बांबूपासून तयार केलेल्या केरसुन्या, टोपल्या आणि सुपड्या विकून […]
बायकोला नांदण्यास पाठवत नव्हते; जावयाची सासरवाडीत आत्महत्या
पत्नीला नांदायला पाठवत नसल्याने जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शेवगा येथे जालना तालुक्यातील भाटेपूरी येथील सासुरवाडीत जावयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दीपक दत्ता भोंडे (28) याने सासरवाडीतील शेतात गळफास घेत आत्महत्या केली आहे. दीपक याने बुधवारी आत्महत्या केली तर गुरुवारी ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पत्नीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात […]
२ रुपयांची पेप्सी बनली ७ मुलांच्या मृत्यूचे कारण
राजस्थानच्या सरूपगंजजवळील फुलाबाई खेडा येथे 7 मुलांचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे. ब्लॉक, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय वैद्यकीय पथके फुलाबाई खेडा येथे झालेल्या या बालकांच्या मृत्यूचे कारण शोधत आहेत. गुरुवारी आणखी दोन मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळच्या वेळी प्लॅस्टिकच्या पाईपमध्ये विकले जाणारे शीतपेय (पेप्सी) चे सेवन केल्यामुळे […]











