गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जन्मदात्या आईला मुलांनी 10 वर्ष कोंडले होते खोलीत

नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका निवृत्त पोलीसाने आपल्या भावासोबत मिळून जन्मदात्या आईला तब्बल दहा वर्ष घरात कोंडून ठेवले होते. दहा वर्षांनी दोघांविरूद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

चेन्नईमध्ये एका 72 वर्षाच्या महिलेला तिच्या दोन मुलांनी गेली दहा वर्षे घरात कोंडून ठेवले आहे. निवृत्त पोलीस षण्मुघसुंदरमने आपला भाऊ वेंकटेशन याच्या मदतीने हे केले आहे. षण्मुघसुंदरम (50) आणि वेंकटेशन (45) अशी आरोपी मुलांची नावे आहेत. तर ज्ञानज्योती असे त्या महिलेचे नाव आहे.

राज्याच्या समाजकल्याण विभागाच्या हेल्पलाइन क्रमांक 181 वर शुक्रवारी या एका महिलेच्या अवस्थेबाबत फोन आल्याने ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. विमला आणि दिव्या या दोन महिला कर्मचाऱ्यांनी पोलिसांसह कावेरी नगर येथील महिलेच्या घरी धाव घेतली.

शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली की, तिच्या मुलांनी गेल्या 10 वर्षांपासून महिलेला कोंडून ठेवले होते आणि आईपासून मुलं वेगळी राहत होती त्यांनी तिची फक्त जेवणाची व्यवस्था करुन ठेवली होती. महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक औषधोपचारानंतर तिला मनोरुग्णालयात हलवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, शेजाऱ्यांना महिलेतच्या परिस्थितीबाबत माहिती होते. मात्र भितीने त्यांनी कोणाला काही सांगितलेच नाही. मात्र शुक्रवारी समाज कल्याण विभागाला याबाबत एक अज्ञात फोन आला आणि मुलांच पितळ उघडं पडलं. महिलेचे पती दूरदर्शनचे कर्मचारी होते. मात्र पतीच्या निधनानंतर त्यांच्या मुलीने आईची काळजी घेतली होती.

दुर्देवाने वडिलांच्या निधनानंतर दोन वर्षांनी मुलीचाही मृत्यू झाला. दोन्ही मुलांनी तिची जबाबदारी घेतली नाही. षण्मुघसुंदरम शेजारीच राहत होता आणि वेंकीटेसन पुदुकोट्टाई येथे, दोघांनीही तिच्याकडे दुर्लक्ष केले. याप्रकरणी तामिळ विश्वनविद्यालय पोलिसांनी पोलीस निरीक्षक शनमुगसुंदरम आणि त्याचा छोटा भाऊ वेंकटेशनविरुद्ध कलम 24 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *