ताज्याघडामोडी

कोल्हापुरातील निकालाबाबत चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकारने बाजी मारली आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. तर, भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभव झाला आहे. याप्रकरणी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

“भाजपने एकट्याने ७७ हजार मतं मिळवली” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसेच “ही लढत तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष होती’ असंही ते म्हणाले. हिंदुत्व हा आमचा मुद्दा नाही तर श्वास आहे असं म्हणत पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.

कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम रिंगणात होते. दोन्ही पक्षांमध्ये विजयासाठीची चुरस पाहायला मिळाली. तर या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात ठाण मांडला होता. तर कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जोमात प्रचार केला होता.

मात्र, अखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित पाटील यांना पराभूत केले आहे. विशेष म्हणजे, कोल्हापुरातुन पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी पटकावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *