कामगारांमध्ये हस्तक्षेप करून एसटी कर्मचार्यांच्या भावना भडकावून, भाषणे करून, आक्षेपार्ह वक्तव्य करून संकट निर्माण करत शरद पवारांच्या बारामतीत 12 तारखेला येऊन बारा वाजता मोर्चा काढून हल्ला करीन असे म्हणत पवारांच्या अस्मितेला धक्का देण्याचे काम गुणरत्न सदावर्ते यांनी केले होते. त्या सदावर्तेची आम्ही बारामतीत वाट पाहत असून भविष्यात सदावर्तेच काय पण त्या मनोवृत्तीचे लोक बारामतीत पाऊल टाकले तर त्यांची जीभ हासडणाऱ्यास रोख स्वरूपात अकरा लाखाचे बक्षीस देण्यात येईल.
