ताज्याघडामोडी

शरद पवारांचं भाषण सुरू असताना एकाच व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न, पोलिसांनी घेतले ताब्यात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना ताजी असताना आज जालन्यात (jalana) आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. शरद पवार भाषणाला उभे राहिले असता अचानक एका व्यक्तीने व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केला. पण, वेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिदिनी ६० हजार लिटर्स इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पाचे उद्घाटन आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि इतर नेते हजर होते.

राजेश टोपे यांच्या भाषणानंतर शरद पवार बोलायला उभे राहिले होते. नेमकं त्याचवेळी एक व्यक्तीने व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केला. व्यासपीठावरच उभ्या असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही व्यक्ती व्यासपीठावर का चढत होती, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. या गोंधळानंतर पुढील कार्यक्रम सुरळीत पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *