ताज्याघडामोडी

पावसाचं राज्यात लवकरच आगमन, ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

येत्या 24 तासात मान्सून पाऊस अंदमानात दाखल होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. आज अनुकूल स्थिती असल्यामुळे मान्सून पावसाचं (नैऋत्य मोसमी वारे) अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात आगमन होऊ शकतं. त्यातच केरळच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनची प्रगती वेगानं होत आहे. त्यामुळे मान्सून 24 […]

ताज्याघडामोडी

ब्राह्मण समाजाला उद्देशून शिवीगाळ केल्याचा आरोप, अमरावती भाजपाच्या जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल

ब्राह्मण समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या विरोधात परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. निवेदिता चौधरी यांनी हे आरोप नाकारले आहेत, पण या निमित्ताने भाजपामधील गटबाजी देखील उघड झाली आहे. परशुराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष चेतन पुरोहित यांनी परतवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या […]

ताज्याघडामोडी

चक्क गंगा नदीत लपवून ठेवली हजारो लिटर अवैध दारू; उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त

बिहारमध्ये दारूबंदी असूनही दारुचे अवैध धंदे सुरुच आहेत. मद्यतस्करांनी आता चक्क नदीतच दारू लपवून ठेवल्याची घटना सारण जिल्ह्यातील छपरामध्ये उघडकीस आली आहे. सारण जिल्ह्यातील नदीत माशांचे प्रमाण अचानक कमी झाले आणि पाण्याला फेस येत होता. त्यामुळे पाहणी केल्यावर ही घटना उघडकीस आली आहे. बिहारमध्ये दारुविरोधात आणि मद्यतस्करांविरोधातील कारवाईला गती देण्यात आल्याने तस्करांनी आता थेट नदीतच […]

ताज्याघडामोडी

प्रसंगी रक्त सांडु पण उजनी धरणातून एक थेंब ही पाणी जाऊ देणार नाही – माऊली हळणवर 

मोहोळ आज आज मोहोळ येथे उजनी पाणी संघर्ष समिती च्या वतीने बैठक झाली या बैठकीमध्ये तीव्र भावना व्यक्त करण्यात येत होत्या. सोलापूर जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन, शिरापूर उपसा सिंचन, सीना-माढा उपसा सिंचन, एकरुख उपसा सिंचन, मंगळवेढा ३५ गाव उपसा सिंचन, सांगोला उपसा सिंचन, सीना भीमा उपसा सिंचन, दहिगाव उपसा सिंचन या उजनी जलाशयावर चालणाऱ्या योजना […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

म्हातारपणाच्या आधारासाठी तीन लाखात बाळाची खरेदी; शिक्षिकेसह तीन जणांना अटक

नागपूर – म्हातारपणी आधार मिळावा या उद्देशाने एका शिक्षिकेने सुमारे तीन वर्षांपूर्वी एका मुलाला दलालांच्या मार्फत तीन लाख रुपयांमध्ये विकत घेतले होते. मात्र त्याच महिलेच्या मोठ्या मुलाने या प्रकरणाची गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केल्यामुळे मानव तस्करीची घटना उघडकीस आली आहे. तक्रात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तापसाअंती तीन महिलांसह एका दलालाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक […]

ताज्याघडामोडी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बहिण संजीवनीताई करंदीकर यांचं निधन

प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनीताई करंदीकर यांचं आज (शुक्रवार) पुण्यात निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावलं! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली संजीवनी करंदीकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र […]

ताज्याघडामोडी

नोकरी मिळविणे म्हणजे शिक्षण नव्हे- डाॅ. कैलाश करांडे

स्वतःच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवून जीवन जगले पाहिजे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना प्लेसमेंट हा महत्त्वपूर्ण टप्पा असतो. तो टप्पा यशस्वी करायचा असेल तर मेहनत घेणे आवश्यक आहे. महाविद्यालय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. म्हणून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यास करून यश प्राप्त करावे केवळ नोकरी मिळवी म्हणून […]

ताज्याघडामोडी

“चंद्रकांत पाटील आणि भाजपाने शरद पवारांची जाहीर माफी मागावी नाहीतर…”; राष्ट्रवादीचा इशारा

भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविषयी एक आक्षेपार्ह ट्विट करण्यात आल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला कायदेशीर लढाईचा इशारा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी एक पत्रक जारी करत पवारांबद्दल करण्यात आलेल्या ट्विटवरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच भाजपाने पवारांची माफी मागणी असं म्हटलं आहे. कीव येते… भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट […]

ताज्याघडामोडी

‘कुत्रा आहे, भुंकतोय, भूंकू द्या’, अकबरुद्दीन औवेसींची राज ठाकरेंवर खोचक टीका

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता खोचक शब्दांत टीका केलीय. राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. याच पार्श्वभूमीवर औवेसींनी राज ठाकरेंवर टीका केली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता अतिशय टोकाच्या शब्दांमध्ये टीका केली. त्यांच्या या […]

ताज्याघडामोडी

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरुन वाद; जालन्यात दगडफेकीनंतर पोलिसांकडून गोळीबार

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि गावच्या प्रवेश द्वारावरील गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वार लिहिलेलं बॅनर हटवण्यावरून जालन्यात मोठा वाद झाला. संतप्त जमावाने यावेळी पोलिसांवर दगडफेक केली. भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को या गावात ही घटना घडली असून, पोलिसांनी यावेळी हवेत गोळाबार देखील केला. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जालन्यातील चांदई एक्को गावात छत्रपती […]